गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
एम.आय. डी .सी .पोलिस स्टेशन मधील पोलिस नाईक युवराज जाधव एक हजार रुपये घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळयात
लातूर/प्रतिनिधि
तक्रारदार यांचे विरुध्द दाखल झालेल्या भांडणाच्या गुन्ह्यामध्ये तक्रारदार यांना अटक न करता सोडून देण्यासाठी केलेल्या मदतीचा मोबदला आणि दाखल गुन्ह्यात भविष्यात मदत करण्यासाठी आरोपी लोकसेवक युवराज जाधव यांनी तक्रारदार यांना पंचासमक्ष 1,000/- रुपयाची लाचेची मागणी केल्याप्रकरणी लातलुचपत विभागाच्या जाळयात अडकल्याने लातूर पोलिस प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली आहे.तक्रारदार यांनी दयानंद कॉलेज गेट पोलीस चौकी येथे जाऊन आरोपी युवराज जाधव यांची भेट घेतली असता त्यांनी मागणी केलेली लाचेची रक्कम 1,000/- रुपये पंचासमक्ष स्वतः स्विकारल्याने त्यांना जागीच रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याबाबत पोलीस स्टेशन एमआयडीसी लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
लातूर पोलिस प्रशासनामध्ये लाचलुचपत विभागाची नजर पडल्यामुळे आता लातूर शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील पोलिस आता सतर्क झाले आहेत.आता पुढील आठ दिवस पोलिस स्टेशन मध्ये शुकशुकाट दिसला तर नवल वाटायला नको!या कार्यवाही मुळे पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्यूरो, लातूर यांची लाचखोर अधिकार्यां मध्ये दहशत मात्र वाढत चलली आहे.नविन वर्षा मध्ये पोलिस प्रशासनावर झालेली ही पहिली कार्यवाही असून यापुढेही असाच धुमधडाका चालू राहिल असे मत सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
➡ *मार्गदर्शक:-*
1.डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधीक्षक,
अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड
(मो.नं.09623999944)
2.रमेशकुमार स्वामी, अपर पोलीस अधीक्षक,
अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड
➡ *पर्यवेक्षण अधिकारी :-*
पंडीत रेजितवाड, पोलीस उप अधीक्षक,
अँटी करप्शन ब्यूरो, लातूर
(मो.नं.09309348184)
➡ *सापळा पथक :-*
अन्वर मुजावर, पोलीस निरिक्षक आणि
भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक व टीम अँटी
करप्शन ब्यूरो, लातूर.
-------------------------------------------------
*लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
अँटी करप्शन ब्यूरो, लातूर कार्यालय दुरध्वनी - *02382-242674*
@ टोल फ्रि क्रं. 1064