व्हाईस ऑफ मीडियाच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी संगम कोटलवार यांची निवड
लातूर: व्हाईस ऑफ मीडियाच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी दैनिक सारथी समाचारचे संपादक संगम कोटलवार यांची दि. १७ जानेवारी २०२४ रोजी निवड करण्यात आली आहे.
त्यांची ही निवड लातूर येथे व्हाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या उपस्थितीत लातूर येथे घेण्यात आलेल्या विशेष बैठकीत करण्यात आले. यावेळी या बैठकीला रंगनाथ सगर,निशांत भद्रेश्वर,दीपरत्न निलंगेकर, अमर साखरे, प्रभाकर शिरोरे, शहाजी पवार, बाळासाहेब जाधव,धोंडीराम ढगे, डॉ.सितम सोनवणे, अरुण हांडे, काकासाहेब गुट्टे, योगीराज पिसाळ आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल लातूर शहर व परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे...