रेणापूर क्रीडा संकुल अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आ. रमेशआप्पा कराड यांचा सत्कार
लातूर दि.३०- रेणापूर तालुका क्रीडा संकुल अध्यक्षपदी विधानपरिषदेचे सदस्य भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करून रेणापूर तालुका भाजपाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या सतीश आंबेकर यांनी शाल घालून पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी अॅड. दशरथ सरवदे, डॉ. बाबासाहेब घुले, वसंत करमुडे, अनंत चव्हाण, गंगासिंह कदम, श्रीकृष्ण जाधव, बिबीशन उपाडे, शिवाजी जाधव, सुधाकर फुले यांच्यासह अनेक जण होते.