एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात अयोध्येतील श्रीराम मंदिराचा आनंद उत्सव साजरा
लातूर दि.२३ :- लातूर :- आयोध्या नगरीत प्रभू श्रीराम मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असल्याने लाखो नव्हे तर करोडो राम भक्तांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाल्याचा आनंद उत्सव लातूर येथील एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयात साजरा करण्यात आला यावेळी रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी विद्यार्थ्यासह रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने होते.
प्रत्येक भारतीयांचा श्रद्धास्थान असलेले मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या अयोध्या या जन्मभूमीत भव्य मंदिर व्हावे ही अनेक वर्षांची स्वप्नपूर्ती पूर्ण होत असल्याचा आनंद लातूर येथील एमआयटीच्या वैद्यकीय महाविद्यालय आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने कार्यकारी संचालक आ रमेशआप्पा कराड यांच्या संकल्पनेतून आणि प्रशासकीय व शैक्षणिक संचालक डॉक्टर सरिता मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयाच्या गोल घुमट परिसरात दहा फूट उंचीच्या भव्य श्रीरामाच्या प्रतिमेची सजावट करून आकर्षक रोषणाई करण्यात आली रांगोळ्या काढण्यात आल्या. दिवे लावण्यात आले. यावेळी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठापना सोहळा थेट प्रक्षेपण कार्यक्रमाचा उपस्थितानी आनंद घेतला. तत्पूर्वी भजन त्याचबरोबर श्रीराम स्त्रोत स्त्रोतचे पठण करून महाआरती करण्यात आली.
जय श्रीराम, जय जय श्रीराम अशा विविध घोषणांनी परिसर घुमून गेला होता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि स्वप्नपूर्तीचा उत्साह ओसंडून वाहत होता यावेळी एमआयटी वैद्यकीय महाविद्यालयाचे सहअधिष्ठता डॉ बसवराज नागोबा, प्रशासकीय शैक्षणिक संचालक डॉ. सरिता मंत्री, ग्रामीण रुग्णालयातील विभाग प्रमुख डॉ अरुण कुमार राव, डॉ मालू, डॉ एन व्ही कुलकर्णी, डॉ चंद्रकला पाटील, डॉ क्रांती केंद्रे, डॉ विद्या कांदे, डॉ तोष्णीवाल, डॉ. शैला बांगड, डॉ भालेराव, बालासाहेब गीते, मारुती हत्ते त्याचबरोबर अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रुग्णाचे नातेवाईक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.