Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

सोमनाथ स्वामी डिगोळकर यांची शिवसेना (ऊबाठा) निलंगा विधानसभा प्रमुखपदी निवड

सोमनाथ स्वामी डिगोळकर यांची शिवसेना (ऊबाठा) निलंगा विधानसभा प्रमुखपदी निवड


लातूर - 
संबंध लातूर जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, पत्रकारीता व सर्व क्षेत्राची निकडची ओळख, परिचय, अभ्यास असलेले तसेच या पुर्वी जिल्ह्यातील दिग्गज राजकीय नेत्याकडे खाजगी सचिव, जनसंपर्क प्रमुख, मिडीया प्रमुख म्हणून कार्य केलेले गत २५ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्रात निडरपणे कार्यरत असणारे विशेषतः निलंगा विधानसभा मतदार संघातील निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी तालुक्यात वैचारीका, राजकीय, सामाजिक प्रभाव असलेले नेहमी विविध सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे तसेच गत दहा वर्षापासून शिवसेना (ऊबाठा) गटाचे एक निष्ठावाण, एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून पक्षवाढीसाठी कार्यतत्पर राहिलेले सोमनाथ स्वामी डिगोळकर यांची पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेच्या निलंगा विधानसभा प्रमुखपदी निवड करण्यात आल्याचे पक्षाच्यावतीने घोषित केले आहे. 
सोमनाथ स्वामी डिगोळकर हे उच्चशिक्षीत असून ते पुर्वीपासूनच सामाजिक चळवळीत व वैचारिक, राजकीय कार्यात तसेच सामाजिक संघटना, संघटनात्मक चळवळीत प्रबोधन व समाज कार्यात सातत्याने कार्यरत राहिलेले आहेत. त्यांना लातूर जिल्ह्यातील सर्व क्षेत्राचा चांगला अभ्यास असून त्यांना निकडची ओळख आहे. त्यांनी आजपर्यंत वैचारीक राजकारण करून सामाजिक प्रश्‍न सोडविण्यासाठी विविध जनआंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला होता. त्याचबरोबर निलंगा विधानसभा मतदार क्षेत्राच्या, तालुक्यातील जनतेचे प्रश्‍न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी शिवसेनेच्यावतीने व वृत्तपत्राच्या माध्यमातून मोठे प्रयत्न केलेले आहेत. शिवसेनेच्यावतीने मागील काळात करण्यात आलेल्या आंदोलनात त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला असून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यकाळातील जनहितार्थ शासन निर्णय, लोककल्याणकारी योजनेची माहिती पक्षाच्या वतीने राबविण्यात आलेल्या शिवसंपर्क व शिवसंवाद अभियानांतर्गत त्यांनी प्रसार, प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी औसा व निलंगा विधानसभा मतदार संघात आघाडीवर पक्षीय कार्य केलेले आहे.  
सोमनाथ स्वामी डिगोळकर यांनी आजपर्यंत निष्ठापुर्वक एकनिष्ठपणे केलेले पक्षीय संघटनात्मक कार्य पक्षवाढीसाठी केलेले आटोकाट आघाडीवरचे प्रयत्न या सदर कार्याची दखल वरिष्ठ पक्षपातळीवर, पक्षश्रेष्ठीने घेऊनच त्यांच्यावर पक्षाने निलंगा विधानसभा मतदार संघात शिवसेनेचा भावी आमदार निवडून आणण्यासाठी त्यांची विधानसभा प्रमुखपदी निवड केल्याचे बोलले जात असून त्यांच्या निवडीबद्दल निलंगा विधानसभा मतदार संघातील तिनही तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकाकडून व सर्व क्षेत्रातील मित्र परिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Previous Post Next Post