Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

कवी संमेलनाने जिंकली रसिकांची मने

कवी संमेलनाने जिंकली रसिकांची मने 


एड. मनोहरराव गोमारे साहित्यनगरी, लातूर : महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीने लातुरात आयोजित करण्यात आलेल्या नवव्या राज्यस्तरीय शिक्षक संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी पार पडलेल्या कवी संमेलन आणि गझल मुशायऱ्याने लातूरच्या तमाम रसिक श्रोत्यांची मने जिंकली. कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सुधाकर तेलंग हे होते तर कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी , गझलकार योगुराज माने हे होते. 
        कोणतेही साहित्य संमेलन म्हटले की कवी संमेलन आणि गझल मुशायरा ओघाने आलाच. लातूरच्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनातही कवी संमेलन आणि गझल मुशायऱ्याच्या कार्यक्रमाने उपस्थितांना अक्षरशः जागेवरच खिळवून ठेवण्याचे काम केले. यावेळी गुरुजनांबद्दलचा आदर व्यक्त करणाऱ्या स्वच्छ.. निर्मोही आहोत आम्ही, ज्ञान देणारे झरे आहोत आम्ही या दयानंद बिराजदार यांच्या काव्यपंक्तींनी उपस्थितांच्या मनाचा वेध घेतला. योगीराज माने यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना प्रत्येकाने आपल्या हृदयातील निरागस मूल जपले पाहिजे असे नमूद केले. त्यांच्या ' तो विश्वाचा मालक आहे, चराचराचा पालक आहे, ह्या धडधडत्या हृदयामध्ये एक निरागस ब्लॅक आहे ' या गझलेने उपस्थितांना मंत्रमुग्ध करून सोडले. 
      या कवी संमेलनात गोविंद जाधव,विशाल अंधारे, डॉ.नितीन गायकवाड , प्रकाश घादगिने, जना घुले, नरसिंग इंगळे, विश्वंभर इंगोले, रामदास कांबळे, नामदेव कोद्रे, दिलीप लोभे, राजेंद्र माळी, देवदत्त मुंढे, अरविंद हंगरगेकर, श्याम नवले,हणमंत पडवळ, संतोष नारायणकर, गोविंद गारकर, सत्यशीला कलशेट्टी, सविता धर्माधिकारी, सुप्रिया दापके,रंजना गायकवाड , सीता पुरी, शिवाजी गायकवाड या कवींनी आपल्या कविता सादर केल्या. तर गझलकार अजय पांडे, संतोष कुलकर्णी , सुरेश गीर, कालिदास चवडेकर, यशवंत मस्के, निलोफर फनिबंद, युवराज नळे, जोश लातूरी, प्रमोद जाधव ,राही कदम ,डॉ.नीलेश नागरगोजे यांनी उत्तम गझल प्रस्तुत केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत सातपुते, दयानंद बिराजदार यांनी तर आभार प्रदर्शन डी.सी. गायकवाड यांनी केले. 
Previous Post Next Post