Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

राम मंदिर ट्रस्ट अयोध्या कडून भटक्या विमुक्त समाजाचा महाराष्ट्रातील सात व्यक्तींना निमंत्रण

राम मंदिर ट्रस्ट अयोध्या कडून भटक्या विमुक्त समाजाचा महाराष्ट्रातील सात व्यक्तींना निमंत्रण 








लातूर दि २ राम मंदिर ट्रस्ट अयोध्या कडून भटक्या विमुक्त समाजाचा महाराष्ट्रातील सात व्यक्तींचा सन्मान करीत त्या त्या समाजाच्या प्रतिनिधीला आग्रहाचे निमंत्रण पाठवल आहे. या मध्ये मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, हिंगोली जिल्ह्यातील त्या त्या समाजातील मान्यवर कार्यकर्ते आहेत. अशी माहिती भटके विमुक्त विकास परिषद कार्याध्यक्ष डॉ संजय पुरी यांनी दिली आहे 
492 वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू रामचंद्र आपल्या अयोध्या येथील मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे भाग्य देशातील काही निवडक लोकांना प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमाला देशातील प्रमुख संत व राजकीय पक्षांचे प्रमुख तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इत्यादी मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. आपल्या देशाची परंपरा ही समरसते एकत्वाची आहे. या भव्य दिव्य सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना निमंत्रण जात आहे. आपल्या देशाची व संस्कृतीची वेगळी ओळख आहे. 
या समारंभाला भटके विमुक्त समाजाचे सुद्धा प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. राम मंदिर ट्रस्ट अयोध्या कडून भटक्या विमुक्त समाजाचा सन्मान करीत या समाजाच्या प्रतिनिधीला आग्रहाचे निमंत्रण आहे. राम मंदिर ट्रस्ट मार्फत चाकुर येथिल सामाजिक कार्यकर्ते व मसनजोगी समाजाचे प्रमुख श्री लक्ष्मण मुकुटमोरे , तुळजापूर येथील वडार समाजातील प्रमुख कार्यकर्ते श्रीमती भारतीबाई देवकर तसेच भिवंडी येथील मांग गारुडी समाज युवा परिवर्तन सामाजिक सेवा संस्था अध्यक्ष दीपक लोंढे अ.भा.बेरड रामोशी सेवा समिती अध्यक्ष एडवोकेट सुरेश भिमराव गस्ती नागपूर जिल्ह्यातील पारधी विकास परिषद- विदर्भ अध्यक्ष श्री बबनराव गोरामन तसेच कार्यक्रमासाठी सिंदखेड राजा येथील अखिल भारतीय पाथरवड समाज महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष भास्करराव बलकार , , नाथजोगी समाज हिंगोली येथील सामाजिक कार्यकर्ते नारायण बाबर कार्यक्रमाचे निमंत्रण प्राप्त झाले आहे. नेहमीच मुख्य प्रवाहा पासून लांब राहिलेल्या या भटके विमुक्त समाजाला हा सन्मान मंदिर ट्रस्टी प्राप्त करू दिल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त केल्या जात आहे. या निमंत्रणामुळे भटक्या विमुक्त समाजाचे हिंदू समाजातील योगदान पुन्हा एक वेळा सिद्ध झाले आहे.
Previous Post Next Post