गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
महिला पोलीस शिपायांवर वरिष्ठ अधिकार्यांकडून लैंगिक शोषण ; घटना चुकीची
"काही प्रसार माध्यमे व समाजमाध्यमांवर मुंबई पोलीस दलातील महिला शिपाई यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे वृत्त प्रदर्शित झाले. या प्रकरणी सखोल माहिती घेण्यात आली. याप्रकरणी तथाकथित अर्जदारांकडे चौकशी केली असता असा अर्ज त्यांनी केला नसून त्याचे नाव व सही कुणीतरी अज्ञात माणसाने खोडसाळपणे वापर केल्याचे समजून आले आहे. ही माहिती पूर्णपणे चुकीची असून काही समाजकंटकांनी जाणीपूर्वक सदरचे कृत्य केले असल्याचे समजून आले आहे. या अर्जामध्ये नमूद करण्यात आल्याप्रमाणे अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नसून खोडसाळपणाने अर्ज करण्याऱ्याचा शोध घेऊन त्याच्याविरूद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे, असे स्पष्टीकरण मुंबई पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी केले आहे.
मुंबई पोलीस दलाच्या नागपाडा मोटार परिवहन विभागात काम करणाऱ्या आठ महिला पोलीस शिपायांचा तीन वरिष्ठ पोलीस अधिकार्यांनी तुम्हाला कमी काम लावतो, असं अमिष दाखवून लैंगिक शोषण करुन अनेक दिवसांपासून त्यांच्यावर बलात्कार करत असल्याचा आरोप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली परंतू ही माहिती आता चुकीची असल्याची स्पष्टीकरण मुंबई पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी केले आहे
.8 महिला पोलिसांनी पोलीस आयुक्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून बलात्कार होत असल्याचा गंभीर आरोप या महिला पोलिसांनी केला होता.अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नसून खोडसाळपणाने अर्ज करण्याऱ्याचा शोध घेऊन त्याच्याविरूद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची तजवीज ठेवली आहे.असे स्पष्टीकरण मुंबई पोलीस उपायुक्त (अभियान) यांनी केले आहे.