साहेब..!तुमच्या नंतर,सार्वजनिक बांधकाम विभाग क्र २ चे कार्यालय उदगीर येथे स्थलांतरीत;नागरिकांमध्ये तिव्र संताप
लातूर/प्रतिनिधी : - लातूर येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ चे कार्यालय उदगीर येथे स्थलांतरीत झाले,एवढ्यावरचं न थांबता त्या कार्यालयाचे नाव बदलूंन सार्वजनिक बांधकाम विभाग,उदगीर असे करण्यात आल्याने लातूर मध्येच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात ही बातमी वार्यासारखी पसरली असून यामुळे लातूर मधील नागरिकांमध्ये तिव्र संताप निर्माण झाला आहे.प्रथमत:या सार्वजनिक बांधकाम विभाग क्र. २ च्या कार्यलयाने बीड व्हाया उस्मानाबाद मार्गे लातूर आणि आता उदगीर असा प्रवास केला आहे
लातूरचे सुपुत्र तथा माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख हे लातरचेच नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्राचे भुषण आहेत त्यांनी लातूरकरांच्या सोयीसाठी विविध विभाग व खात्यांची वेगवेगळी कार्यालये लातुरात सुरू केलेली आहेत.
परंतू आता हे चित्र बदलत आहे.महाराष्ट्रामध्ये झालेली राजकिय पक्षांची तोडमोड ही यासाठी कारणीभुत असून पक्षांच्या आणि वयक्तिक फायद्यासाठी अशी कार्यालय पळवण्याचा घाट घातला जात असल्याचे दिसत आहे.यासाठी अहमदपूर येथून बाबासाहेब पाटील यांनी प्रथम विरोध दर्वविला होता परंतू लातूर मधील आमदार यांनी याबाबत मौन बाळगल्याकारणाने त्याचा काहिही उपयोग झालेला दिसत नाही.आता सर्वसामान्य नागरिकांबरोबर लातूर मध्ये स्थायिक झालेले या विभागीतील शासकीय अधिकारी यांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.रोज कार्यालयामध्ये पोहचण्यासाठी नागरिकांना सकाळी लाल बसचा चेहरा बघावा लागणार आहे.मुळात जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले हे कार्यालय आता तालुक्याच्या ठिकाणी गेल्यामुळे नागरिकांमध्ये तिव्र संताप निर्माण झाला आहे.आता आमदार,खासदार फंडातील कामासाठी देण्यात आलेल्या पत्रांचा प्रवास उदगीर मार्गे सुरु होणार असून अधिकार्यांवर नागरिकांसोबत राजकिय दबाव ही वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत मात्र उदगीरचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे क्रीडा व युवा कल्याणमंत्री संजय बनसोडे यांचे विशेष कौतूक करायला हवे..कारण लातूर मध्ये स्व.विलासरावसाहेबांचे दोन पुत्र..दोन्हीही आमदार.. विशेष म्हणजे त्यांचे प्रस्थापित सरकारमधील विविध नेत्यांचे खास संबंध..वर्षातून आकरा महिने मुंबई ला असणार्यांच्या कानाला खबर लागलेली असताना देखील हे कार्यालये स्थलांतरित होण्याचा शासनादेश काढला जातो त्यामुळे लातूरचं नव्हेतर संपुर्ण महाराष्ट्रात आमदार अमीत देशमुख यांची नाचक्की होत आहे.
आता उदगीर जिल्हा करण्यासाठीही प्रयत्न चालू असून,जर जिल्हा झालाच तर मात्र खासदारकीसाठी राज्याचे क्रीडा व युवा कल्याणमंत्री संजय बनसोडे यांचे नाव प्रकर्षाने समोर येईल आणि भाजपाच्या वाट्याला खाजदारकीची एक सीट वाढण्यातही मदत होईल.नुकतेच नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे कौतूक केल्याचे समते एकंदरीतचं ते खासदार झाले तर नवल वाटायला नको!
कार्यालय पळवापऴवीच्या अशा घटनेमुळे पुढील धोका ओळखून आता लातूरच्या आमदारांनी वेळीच सावध होण्याची गरज भासत आहे...! त्यांनी जिल्ह्याची माहिती चा श्रोत वाढवून उरलेल्या कार्यालयावर लक्ष ठेवणे अवश्यक बनले असून तसे काही अढळल्यास आंदोलनही करण्यास मागे पुढे पाहू नये...अशी सर्वसामान्य नागरिकांकडून भावना व्यक्त होवू लागली आहे.