Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

कार अपघातात उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांच्या मुलाचा जागीच मृत्यू

कार अपघातात उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांच्या मुलाचा जागीच मृत्यू




औसा तालुक्यातील आशिव पाटीजवळ झालेल्या कार अपघातात उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. या अपघातात कारमधील अन्य दाेघे किरकोळ जखमी झाले आहेत.

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आशिव पाटी येथे परभणी जिल्ह्यातून भाजीपाल्याची वाहतूक करणारा टेम्पो नादुरुस्त अवस्थेत उभा होता. त्यावेळी सोलापूरहून लातूरकडे प्रसाद निटूरे हे एमएच २४ एएस १६०० या क्रमाकांच्या कारने येत होते. दरम्यान, या कारची टेम्पाेला पाठीमागून जोराची धडक बसली. त्यात प्रसाद निटूरे गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाले, अशी प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, त्यांच्यासोबतचे अन्य दोघे किरकोळ जखमी आहेत. महामार्गावरील काहींनी तात्काळ जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रसाद निटूरे यांचे रुग्णालयात येईपर्यंत निधन झाले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
Previous Post Next Post