भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते मुरुड येथील आयोध्या कारसेवकांचा सन्मान
लातूर दि.२३:- प्रभू श्रीराम यांची जन्मभूमी आयोध्या येथे श्रीरामाचे मंदिर व्हावे यासाठी कारसेवेत सहभागी झालेल्या मुरुड येथील कारसेवकांचा भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
आयोध्यातील भव्य मंदिरात प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना निमित्ताने मुरुड ग्रामस्थांच्या वतीने सिद्धिविनायक मंदिर परिसरात हभप दत्तात्रय महाराज फुलारी यांचे कीर्तन झाले यावेळी भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते कार सेवेत सहभागी झालेले हणुमंत बापू नागटिळक, सतीश नाडे, दादा घोगरे, लक्ष्मण सुरवसे, आबा सुरवसे, व्यंकट खराडे, मेघराज गुट्टे, प्रभाकर साबळे, संग्राम काटू, पांडू देशमुख, दत्ता वायाळ, बलराम रेड्डी, सतीश क्षीरसागर, नर्सिंग सापसोड बालाजी लोहार सुरेश सापसोड, प्रशांत आणेराव, गोविंद उटणकर, अजय समुद्रे, रविंद्र लांडगे, किशोर हवालदार, औदुंबर स्वामी, बसलींग स्वामी, सचिन सोमासे, काशीबाई गुट्टे, समाबाई हवालदार, आशाताई रेड्डी, राहीबाई सव्वाशे, चिंगुबाई गरड, केशरबाई दाणे, भामाबाई खराडे, मालन जगताप, प्रयागबाई जाधव, काशीबाई पुदाले, जिजाबाई पुदाले, जनकाबाई सव्वाशे, मथुराबाई होळकर यांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने मुरुड येथे आयोजित करण्यात आलेल्या आनंद उत्सवाच्या कीर्तन व १००८ जोडींच्या हस्ते महाआरती या कार्यक्रमास मुरुड शहरातील रामभक्तांनी मोठी गर्दी केली होती महिलांची संख्या अभूतपूर्व होती. कीर्तनानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी भव्य आतिषबाजी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे नियोजन नागराज बचाटे, विशाल नागटिळक, वैजनाथ हराळे, सतीश कुमठेकर, अमोल गिरवलकर, बाळासाहेब चौधरी, प्रतीक कुलकर्णी, गोकुळ चांडक, विलास नाडे, विक्की काळे, अमित कांकरिया, राजेश मुथा, शिवाजी शितोळे, प्रज्वल कुलकर्णी, गौरव निचळे, पुष्कराज सुरवसे, सतीश माळी, ऋषीकेश काटे, गणेश नागटिळक , विश्वजीत नागटिळक, हरीष खंडेलवाल, संतोष देवकर, मंत्री शेठ, ओम कोरे, भैरवनाथ नाडे, शिवरुद्र स्वामी, विकास गायकवाड, अश्विन खराडे, यांनी केले होते. याप्रसंगी उपसरपंच हणुमंत बापू नागटिळक, लताताई भोसले, आनंत कणसे, रवीआबा नाडे, महेश कणसे, सुभाषजी सुराणा, श्याम करपे, राजेंद्र नाडे, विनोद कणसे, संतोष काळे यांच्यासह मुरुड शहरातील समस्त हिंदु रामभक्त महिला, पुरुष व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.