Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

जिल्हाभरातील शाळेत दर गुरुवारी विद्यार्थ्यांना मिळतील स्वच्छता, व्यसनमुक्ति, व्यक्तिमत्वाचे धडे* - *जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे

सामाजिक न्याय विभागाकडून भव्य व्यसनमुक्ति कार्यशाळा संपन्न
जिल्हाभरातील शाळेत दर गुरुवारी विद्यार्थ्यांना मिळतील स्वच्छता, व्यसनमुक्ति, व्यक्तिमत्वाचे धडे*
 - *जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर -घुगे*






लातूर दि.5 ( जिमाका ) जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि खाजगी शाळामध्ये दर गुरुवारी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता, व्यसनमुक्ति आणि व्यक्तिमत्वाचे धडे द्यायचे आहेत जेणे करून उद्याची पिढी संस्कारक्षम बनेल. तसेच ' माझी शाळा - सुंदर शाळा हा उपक्रमही राबवायचा असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी दिली.
   सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित एक दिवशीय 'नशामुक्त भारत अभियान व संविधान जागृती कार्यशाळा ' उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. या वेळी जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंढे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, या कार्यशाळेसाठी आलेले वक्ते सर्वश्री नंदकुमार फुले, प्रा. डॉ. सविता शेटे, प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापूरे, डॉ. बी. आर. पाटील, प्रा. डॉ. अनिल जायेभाये, डॉ. विजयकुमार यादव, तृतीयपंथाच्या प्रतिनिधी म्हणून प्रिती माऊली लातूरकर,सह्याद्री वृक्ष चळवळीचे सुपर्ण जगताप, लातूर जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोष नाईकवाडी उपस्थित होते.
  लातूर सारख्या शिक्षण पंढरी असलेल्या जिल्ह्यात वाढती व्यसनाधिनता हा चिंतेचा विषय, या बाबत पालकांमध्ये जागृती व्हावी म्हणून मी शिक्षक, पालकांना आवाहन करणारी चित्रफीत सोशल मीडियावर शेअर केली होती. ती चित्रफीत लाखो लोकांपर्यंत गेली, अनेक पालकांनी माझ्याकडे त्यांच्या मनातले बोलल्याची भावना व्यक्त केली. त्यानंतर हा विषय अधिकच गंभीर असल्याचे लक्षात आले. त्यातूनच आठवड्यातून एक दिवस शाळेत विद्यार्थ्यांच्या या विषयाकडे लक्ष देण्यासाठी ठेवण्याची कल्पना रुजली. येथून पुढे गुरुवारी जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत हा पाठ गिरवला जाईल, त्या संदर्भातील सविस्तर मार्गदर्शन तत्वे शिक्षणाधिकारी कार्यालय काढेल अशी माहिती जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी यावेळी दिली.
  कल्याणकारी राज्यात अनेक लोकोपयोगी कायदे होतात पण त्या कायद्याचं ज्ञान शेवटच्या माणसानी आत्मसात करून एक संवेदनशील समाज निर्माण होणं गरजेचं आहे, त्या दृष्टीने अशा कार्यशाळा संजीवनी ठरतात. या कार्यशाळेतील त्या त्या विषयातील तज्ञ वक्ते, जिल्ह्यातील शाळांचे मुख्याध्यापक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आले आहेत याचा अर्थ या विषयाचे गांभिर्य त्यांनाही आहे. त्यामुळे हे सर्वजन कृतीशील काम करतील अशी अपेक्षा जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केली.
जगात विविध विश्वविद्यालयात वेगवेगळ्या डिग्री मिळतील पण माणुसकी नावाची डिग्री आपल्याला आपल्या वागणुकीतून कमवावी लागते हे सांगून डोळस समाज होण्यासाठी अंधश्रद्धाला खतपाणी घालणाऱ्या रूढी आणि परंपराला पायबंद कायद्याने घातला आहे पण समाजाच्या मनातून जाण्यासाठी विवेकवादी समाज निर्माण होण्याची गरज जिल्हाधिकारी यांनी यावेळी प्रतिपादित केली.
   *जिल्हा पोलीस अधिक्षकांचा विशेष गौरव*
 लातूर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंढे यांना गडचिरोली येथे असताना नक्षलवादी ऑपरेशन मध्ये उत्कृष्ट कार्यकेल्या बद्दल राष्ट्रपतीनी गौरव केला त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
   समाजात वाढत चालेली व्यसनाधिनता आणि अंधश्रद्धा या अत्यंत महत्वाच्या विषयाच्या जागृतीसाठी ही कार्यशाळा ठेवल्याबद्दल सामाजिक न्याय विभागाचे अभिनंदन करून अंधश्रद्धेचे बळी शिकलेले लोकंही पडतात हे सोदाहरण जिल्हा पोलीस अधिक्षक सोमय मुंढे यांनी सांगितले.
लातूर जिल्ह्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा असेल वा व्यसनमुक्तिच्या जनजागृतीसाठी पोलिसांनी घेतलेला पुढाकार असेल त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती, विविध संघटना नागरिक पुढे येऊन सहकार्य करतात हे आपण अनुभवल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशेटवार यांनी केले. त्यात त्यांनी या कार्यशाळेच्या आयोजना मागची भूमिका सांगून या कार्यशाळेत प्रशिक्षण घेऊन त्या त्या शाळेचे मुख्याध्यापक याबाबतीत वर्षभर जनजागृत करणार आहेत अशी माहिती दिली.
या कार्यशाळेत नंदकुमार फुले, प्रा. डॉ. सविता शेटे, प्रा. डॉ. हर्षवर्धन कोल्हापूरे, डॉ. बी. आर. पाटील, प्रा. डॉ. अनिल जायेभाये, डॉ. विजयकुमार यादव, प्रिती माऊली लातूरकर यांनी अंधश्रद्धा, संविधान जागृती, दिव्यांग कल्याण, तृतीय पंथी याविषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिली.

Previous Post Next Post