Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

रेणापूरच्‍या पुरातन श्रीराम मंदिर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - आ. रमेशअप्‍पा कराड

रेणापूरच्‍या पुरातन श्रीराम मंदिर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही - आ. रमेशअप्‍पा कराड









          लातूर दि.१९- प्रदिर्घ संघर्षानंतर आयोध्‍येत प्रभू श्रीराम यांच्‍या भव्‍य दिव्‍य मंदिराचे करोडो भाविकांचे स्‍वप्‍न देशाचे यशस्‍वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्‍या कल्‍पनेतून साकार होत आहे. यानिमित्‍ताने देशभर आनंद उत्‍सव साजरा केला जात असून रेणापूर येथील पुरातन काळातील प्रभू श्रीराम मंदिराच्‍या सर्वांगिन विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे प्रतिपादन भाजपाचे नेते आ. रमेशअप्‍पा कराड यांनी केले.

          आयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात २२ जानेवारी रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असल्याने देशभर आनंद उत्सव साजरा केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून रेणापूर येथील पुरातन काळातील प्रभू श्रीराम मंदिर आहे या मंदिरात १८ ते २२ जानेवारी दरम्यान होम हवन, भजन, राम नाम जप पालखी सोहळा, सार्वजनिक महाआरती आणि महाप्रसाद विविध कार्यक्रम होत आहेत.

         असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या रेणापूर येथील पुरातन काळातील प्रभू श्रीराम मंदिरात आनंद उत्सव सोहळा सुरू असून भक्तिमय वातावरणात सुरू असलेल्या या आनंद सोहळ्यात भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड आणि खा. सुधाकर शृंगारे यांनी शुक्रवारी सकाळी सहभागी होऊन महापूजा व आरती केली. यावेळी भाजपाचे विक्रमकाका शिंदे, अॅड. दशरथ सरवदे, वसंत करमुडे, अभिषेक आकनगिरे, सतीश आंबेकर, नवनाथ भोसले, सुकेश भंडारे, डॉ. बाबासाहेब घुले, भागवत गीते, बालाजी वैष्णव, बब्रुवान येलमटे, शिवाजी आकनगिरे, नामदेव साबदे, गणपत दरोडे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

          यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्‍हणाले की, रेणापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आतापर्यंत कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याने मोठ्या प्रमाणात विकासाची कामे झाली आहेत. शहराचा चेहरा आणि मोहरा बदलून गेला आहे. पुरातन काळातील श्रीराम मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही असे सांगून ७५ लक्ष रुपयाचा प्रस्ताव लवकरच मंजूर होईल असे बोलून दाखवले. 

श्रीराम मंदिर आणि रेणापूर शहराच्या विकास कामात जिथे जिथे माजी मदत लागेल तिथे निश्चितपणे मदत केली जाईल आपण सर्वांनी मला आशीर्वाद दिला आहे या पुढील काळातही आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा खा. सुधाकर शृंगारे यांनी व्यक्त केली. श्रीराम मंदिरास आमदार निधीतून सभागृह दिल्याबद्दल आणि भविष्यातील विकास कामाला मोठी मदत केल्याबद्दल अभिषेक आकनगिरे, धनंजय खंदाडे, शांतिवीर शिरसागर, सुधीर भातिकीरे, सुरज आकनगीरे, बालाजी वैष्णव यांनी आ. रमेशआप्पा कराड यांचा यथोचित सत्कार केला तर खा. सुधाकर शृंगारे यांचा भाजपाच्या वतीने शहराध्यक्ष अच्युत कातळे, भाजयुमो शहराध्यक्ष संतोष राठोड यांनी स्वागत केले.

           याप्रसंगी पुनमदास वैष्णव, भागवत खंदाडे, श्रीकृष्ण मोटेगावकर, चंद्रकांत कातळे, दत्ता सरवदे, विजय चव्हाण, उत्तम चव्हाण, श्रीकृष्ण पवार, प्रशांत ईगे, नागुबाई आलापुरे, शीला आचार्य, अनुसया फड, उमा सूर्यवंशी, पवन आकनगिरे, गणेश माळेगावकर, राजू अत्तार, शेख अजीम, उज्वल कांबळे, रमाकांत चव्हाण, गणेश चव्हाण, मारुती गालफाडे, रोहित खुमशे, नागेश बसतापुरे, ईश्वर बद्दर, श्रीमंत नागरगोजे, धम्मानंद घोडके, सचिन शिरसकर, नंदू बंडे, रफिक शिकलकर, हुसेन पठाण, दत्ता उगिले, दिलीप चव्हाण, हनुमंत भालेराव, अंतराम चव्हाण, बाबुराव कस्तुरे, बालाजी अकनगिरे, अंगद आलापुरे, दत्ता बाळे, पप्पू कुडके, सिद्लिंग उडगे, अजय मरलापल्ले, राजकुमार वैष्णव, सुरज फुलारी , नरसिंग शेंदरकर, नारायण राठोड, नितीन क्षिरसागर, मनोज चक्रे, नंदू मोठेगावकर, राजू सूळ, बळी आलापुरे, शरद जाधव यांच्यासह भाविक भक्त, महिला, पुरुष भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post