Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भारतीय जनता पार्टी चे सरचिटणीस ॲड दिग्विजय भैय्या काथवटे यांनी किड्स इन्फो पार्क येथे केले ध्वजारोहण

भारतीय जनता पार्टी चे सरचिटणीस ॲड दिग्विजय भैय्या काथवटे यांनी किड्स इन्फो पार्क येथे केले ध्वजारोहण 







लातूर येथे ७५ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवार दि २६जानेवारी रोजी पेठ ,औसा रोड येथे लातूर शहरातील नामांकित विद्यालय व सौ. प्रितिजी शाह यांच्या संकल्पनेतून साकारलेले किड्स इन्फो पार्क या विद्यालयामध्ये भारतीय जनता पार्टी चे सरचिटणीस ॲड दिग्विजय भैय्या काथवटे यांनी ध्वजारोहण केले.

या कार्यक्रमात बोलताना भारतीय जनता पार्टी चे सरचिटणीस ॲड दिग्विजय भैय्या काथवटे म्हणाले की,
आजच्या ७५ व्या दिनी मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छितो.
संपूर्ण भारत देशामध्ये २६ जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.प्रजासत्ताक दिन हा राष्ट्रीय सण असून प्रत्येक भारतीयाना या सणाचा अभिमान आहे. संपूर्ण देशभरात, राज्यामध्ये, जिल्ह्यात, तालुक्यात, गावात, ग्रामीण भागात अगदी संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात २६ जानेवारी हा सण मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो.७५ व्या प्रजासत्ताक दिनी आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत.
७५व्या प्रजासत्ताक दिनाचे स्मरण करताना माझे हृदय अभिमानाने फुलले आहे. आजच्या या दिवशी मी सर्वांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी दोन मिनिटांसाठी या ऐतिहासिक दिवशी, आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यापासून ते आजच्या चैतन्यशील लोकशाहीपर्यंतच्या प्रवासाचे चिंतन करू या.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन ही केवळ कॅलेंडरवरील तारीख नाही; तर आपल्या राष्ट्राला आकार देणारी मूल्ये, आदर्श आणि त्याग यांचा हा उत्सव आहे. हा दिवस भारतीय संविधानाचा सन्मान करण्याचा दिवस आहे, जो सर्व नागरिकांसाठी न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व सुनिश्चित करतो.
त्यानंतर शाळेतील शिक्षकांनी त्यांचा सत्कार केला.या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.




 
Previous Post Next Post