गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
10 महिन्या पासून बेपत्ता असलेल्या आणखीन एक मुलींला शोधण्यात यश.
पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात AHTU ची कारवाई.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, सन 2023 मध्ये पोलीस ठाणे औसा येथे अल्पवयीन मुलीचा अपहरण झाल्याच्या तक्रारीवरून भादवि कलम 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस नमूद मुलीचा शोध घेत होते परंतु ती मिळून येत नव्हती.
पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे यांनी बऱ्याच कालावधीपासून तपासावर असलेले, आतापर्यंत मिळून न आलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाला (AHTU) आदेशित करून सूचना व मार्गदर्शन करण्यात आले होते.
त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक करण सोनकवडे, महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख व पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी हे त्यांच्या पथकामार्फत वरील गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना अपहरण झालेल्या मुली संदर्भात खूप काही उपयुक्त माहिती नसतानाही AHTU च्या टीमने अपहरण झालेल्या मुलीचा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जाऊन शोध घेतला. तसेच सायबर सेलच्या मदतीने मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून मिळालेल्या माहितीवरून विविध ठिकाणी सदर मुलींचा शोध घेऊन ती शनी शिंगणापूर, दहिवडी, माण, मालवाडी, परिसरात शोध घेऊन ती मिळून आल्याने त्याला पोलिस ठाणे औसा येथे हजर करण्यात आले आहे. पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांचे मार्गदर्शनात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक करण सोनकवडे, महिला पोलीस उपनिरीक्षक शामल देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, पोलीस अमलदार प्रकाश जाधव, सुधामती वांगे, योगी,मापोना गिरी,चालक बुढे तसेच सायबर सेल चे गणेश साठे यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.