व्हॉईस ऑफ मीडियातर्फेे 2 मार्च 2024 रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन
लातूर/
लातूर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया संघटना, एम.आय.एम.एस.आर.आय. आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने 2 मार्च 2024 रोजी दुपारी 12.30 वाजता जिल्ह्यातील व्हॉईस ऑफ मीडियाच्या सदस्यासाठी यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय परिसरातील नेताजी सुभाषचंद्र बोस सभागृहात महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. या महाआरोग्य शिबीराचे उद्घाटन भाजपा नेते तथा आ.रमेश कराड यांच्याहस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी व्हाईस ऑफ मिडीयाच्या सदस्यांना मान्यवरांच्याहस्ते आयुष्यमान भारत कार्डचे वितरणही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, अधिष्ठाता एन.पी.जमादार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. त्यामुळे या महाआरोग्य शिबीराचा लाभ जिल्ह्यातील व्हॉईस ऑफ मीडियाच्या सदस्यांनी घ्यावा असे आवाहन लातूर व्हॉईस ऑफ मीडियाचे लातूर जिल्हाध्यक्ष संगम कोटलवार, साप्ताहिक विंग जिल्हाध्यक्ष विष्णु आष्टीकर यांनी केले आहे.