लातूर मधील ११ पोलीस निरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या
लातूर : जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये कार्यरत असलेल्या अकरा पोलीस निरीक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. गांधी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकप्रेमप्रकाश माकोडे यांची लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तर विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे सुधाकर बावकर यांची जिल्हा विशेष शाखेत बदली करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यातील अकरा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे एका सहायक पोलीस निरीक्षकाचीही बदली करण्यात आली आहे. त्यामध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांची बदली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षात करण्यात आली आहे. त्यांच्या जागी चाकूरचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांची नियुक्ती करण्यात आलीआहे. विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांची बदली जिल्हा विशेष शाखेत करण्यात आली आहे. त्यांच्या जागी वैजना मुंढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यातून आलेले दत्तात्रय निकम यांची चाकूर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.अहमदपूर येथील सुधाकर देडे यांची गांधी चौक पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. गांधी चौकचे पोलीस निरीक्षक प्रेमप्रकाश माकोडे यांची लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलीस नियंत्रण कक्षातील करण सोनकवडे यांची उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. पोलीस नियंत्रण कक्षातील वीरप्पा भुसनुरे यांची अहमदपूर येथे बदली करण्यात आली आहे. पोलीसनियंत्रण कक्षातील वसुंधरा बोरगावकर यांची पोलीस कल्याण लातूर येथे बदली करण्यात आली आहे. परभणी येथून आलेले शिवाजी काकडे यांची जळकोट पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. त्याचप्रमाणे एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले माणिक डोके यांची देवणी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
या जिल्हांतर्गत बदल्या पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी केल्या आहेत. दिलेल्या ठिकाणी तत्काळ हजर राहण्याच्या सूचना मुंडे यांनी बदलीच्या आदेशात दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांासून जिल्हा अंतर्गत बदल्यांची चर्चा होती. मात्र आगामी काळातील निवडणुका लक्षात घेता हे फेरबदल झाले आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षकांना बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ रूज व्हावे लागणार आहेत.