Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पक्षातील काही उच्च पदस्थ व कारखानदारी सांभाळणारी व भंगार विकून मोठी झालेली पिल्लावळ ;भैया ना करतायत बदनाम

पक्षातील काही उच्च पदस्थ व कारखानदारी सांभाळणारी व भंगार विकून मोठी झालेली पिल्लावळ ;भैया ना करतायत बदनाम 



साडेनऊ वर्ष चाललेल्या काँग्रेस पदाधिकारी कल्पना गिरी खून प्रकरणाचा निकाल नुकताच लागला असून 
न्यायालयाने या हत्याकांडाप्रकरणी 2 मुख्य आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर इतर 4 जणांना 3 वर्षांच्या सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सलग साडे 9 वर्षे चाललेल्या या खटल्यात एकूण 126 साक्षीदार तपासण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हत्याकांडाचा उल्लेख 'तंदूर ते लातूर' असा केल्यामुळे हे प्रकरण अवघ्या देशात गाजले होते.
  2014 ची संपूर्ण निवडणूक या मुद्याभोवती फिरत होती. 
काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ता असलेल्या कल्पना गिरी यांचा खून त्यांच्याच पक्षातील इतर सहकाऱ्यांनी केला होता. यामुळे पक्षांतर्गत राजकारण ,महिला पदाधिकाऱ्यांची सुरक्षितता आणि जिल्ह्यातील काँग्रेसचे नेतृत्व या सर्व बाबीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. काँग्रेस आणि काँग्रेसची ध्येयधोरण, महिलांची काँग्रेस मधील स्थान याचं मूल्यमापन या प्रकरणावरून विरोधी पक्षांना सातत्याने करत हाच निवडणुकीचा मुद्दा केला होता.आता पुन्हा एकदा २०२४लोकसभा निवडणुकिच्या पाश्वभुमीवर पक्षातील कुरापती आणि प्रकरणे बाहेर निघत आहेत. पाखरसांगवी गटातील जमीन हडप प्रकारणात कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे व त्यांच्या पी.ए वर काही दिवसापुर्वी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत लातूर सह संपुर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली होती.या प्रकरणामुळे संपुर्ण महाराष्ट्रात काॅंग्रेस पक्षाची प्रतिमा मलीन झाली.पक्षातील काही उच्च पदस्थ व कारखानदारी सांभाळणारी भंगार विकून मोठी झालेली पिल्लावळ सध्या काँग्रेस आणि काँग्रेसची ध्येयधोरण याला हाडताळ फासत भैयाची बदनामी करण्याच्या मार्गाने सुसाट धावत आहेत.राजकारणातली जीवघेणी चढाओढ आणि पैशाच्या हव्यासापोटी आता युवक कार्यकर्त्यां मध्येही स्पर्धा होताना स्पष्ट दिसते आहे. ही बदनामीची सुसाट एक्सप्रेस थांबायचे नाव घेत नाही.भंगार विकून मोठी झालेली पिल्लावळ गल्लीबोळातचं नाही तर संपुर्ण जिल्ह्यात जागा हडप करत फिरत आहेत आणि आता तर यांची टोळीच तयार झाली आहे माझे कोणी वाकडे करू शकत नाही अशी भावना यांच्या मनात तयार झाली आहे म्हणून काय! हे आता पत्रकारांची सुध्दा चेष्टाकरत असून त्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्यासही ते मागे पुढे पाहत नाहीत.अशा परीस्थित राजकीय पक्षातील महिला युवतींची काय परिस्थिति आहे हे न विचारलेलेच बरे... तर सर्वसाधारण महिलांच्या सुरक्षेच काय? असा सवालही उपस्थित होत आहे. जिल्ह्यातील हि काॅंग्रेस ची परिस्थिति अत्यंत वाईट असून यावर भैयांनी वेळीच लक्ष देवून "माने" या ..ना "माने"यांना पक्षातून हकालपट्टी करावी ,तरचं पक्षाची बदनामी थांबेल असे वाटते
Previous Post Next Post