Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

लातूर मध्ये नाट्य संम्मेलनाचा बट्याबोळ...संम्मेलनाचे स्टेज पडून एक जन गंभीर जखमी

लातूर मध्ये नाट्य संम्मेलनाचा बट्याबोळ...संम्मेलनाचे स्टेज पडून एक जन गंभीर जखमी


*लातूर : महासंस्कृती महोत्सव आणि १०० व्या मराठी नाट्य परिषदेच्या मंचावर लोखंडी 'लाईट बार' कोसळला असून एक जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना दयानंद सभाग्रहात घडली..रात्री ९:३०च्या सुमारास.अभिनेते भरत जाधव यांच्या नाटकापूर्वी हि दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे
या नाट्यसंम्मेलनास सकाळ पासूनचं नाट लागली असून 
बालनाट्य 11 वाजता सुरु होण्या ऐवजी... ते 1वाजता सुरु झाले..या कार्यक्रमास पत्रकारही नाराज असल्याचे दिसले; जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांना कुटुंबासोबत यावे
सांगीतले असताना सुध्दा जिल्हा माहिती अधिकार्यांनी पास दिले नाहित ;त्यामुळे फ़ोटो काढण्यासाठी आणि वार्तांकन करण्यासाठी पत्रकार आणि फोटोग्राफर नव्हता...हे विशेष...महासंकृती महोत्सव आणि विभागीय १०० वे नाट्यसंमेलन दोन्ही एकत्र करूनही वेळेचे आणि सुसूत्रतेचे नियोजन करता आले नाही...
नाट्य संमेलनाचे पदाधिकारी नटापटा करून मिरवण्यात आणि चमकोगिरी करण्यात मशगुल... असल्याचे चित्र दिसले तर प्रशसनाने दोन्ही कार्यक्रमाची सांगड घालून कार्यक्रमाचा बट्याबोळ केला... यामुळे लातूर शहरातच नव्हे तर जिल्ह्यात बदनामीचा सुर उमटला.
लातूर येथे होत असलेल्या महसंस्कृती महोत्सव कार्यक्रमासोबत १०० वे नाट्य संमेलन जोडून लग्नात मुंज साजरी करून शासन स्तरावर खर्च मात्र लग्नाचा दाखविण्याचा प्रताप लातूरच्या जिल्हाधिकारी करीत असल्याचा आता या घटनेवरून सिध्द झाले आहे.जिल्ह्यात या कार्यक्रमासाठी करोड़ों रुपयांचानिधीही गोळा करुन स्पॉन्सर ही घेण्यात आल्याची उघड चर्चा होवू लागली आहे.या कार्यक्रमात बोलवण्यात आलेल्या कलाकारांची तर अतिशय दैनिय अवस्था होती. या मध्ये पारंपरिक लोक प्रकारात मोडणार्या कलाकार महिलांच्या साड्या सुध्दा फाटलेल्या अवस्थेत दिसून आल्या.नेमका गोळा केलेला पैसा आणि शासनाचा पैसा गेला कोठे? हा संशोधनाचा भाग आहे.नाट्यसंमेलनाच्या पूर्वरंगपासून आयोजकांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. ढिसाळ नियोजनाचा अनुभव मुख्य कार्यक्रमातही आला. त्यामुळे उर्वरित तीन दिवसांत नियोजनात काही सुधारणा होणार का, हे पाहावे लागणार आहे.

Previous Post Next Post