गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर रचना विभागातील कस्तुरे ह्यांना ,स्तत:साठी आणि मुख्याधिकारी डोईफोडे साठी पाच लाखाची लाच घेतल्याप्रकरणी रंगे हात पकडले
1. काकासाहेब सिध्देश्वर डोईफोडे, वय 39 वर्षे, पद - मुख्याधिकारी, वर्ग 1, नेमणूक - नगरपरिषद, अहमदपूर ता.अहमदपूर, जि.लातूर रा. पाण्याची टाकी, टेंभुर्णी रोड, अहमदपूर
2. अजय विजयकुमार कस्तुरे, वय 55 वर्ष, पद - नगर रचनाकार वर्ग 2, नेमणूक- जिल्हाधिकारी कार्यालय, नगर रचना विभाग, लातूर, अतिरिक्त कार्यभार नगरपरिषद, अहमदपूर ता.अहमदपूर, जि.लातूर, रा. मोती नगर, कान्हेरी रोड, बोरा शॉप च्या बाजूस, लातूर
लातूर/ प्रतिनिधि
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचाराने कहर केला असून माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना भ्रष्टाचार रोखण्यात अपयश येत आहे.किंबहुना त्यांना भ्रष्टाचारावर आळा घालायचाचं नाही कारण जेंव्हा त्यांनी लातूर जिल्हाधिकारी या पदाचा पदभार घेतला होता त्या वेळेस जिल्हाधिकारी कार्यालयातील एका कारकुनाने तब्बल २२करोड चा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले होते ही बातमी ताजी असताना त्यांनी पदभार घेतल्याने लातूरकरांना काहितरी कार्यवाही होईल अशी अपेक्षा होती.त्यांनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदे मध्ये पत्रकारांनी या २२करोड च्या भ्रष्टाचारावर भाष्य करुन संबंधित कार्यालयाचे ॴॅडीट केंव्हा करणार असे विचारले असता या प्रकरणी लवकरच आहवाल आपल्या समोर सादर होईल असे सांगीतले होते परंतू सहा महिने उलटून जावूनही अहवाल मिडीया समोर आला नाही आणि आता लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरचना विभागातील अजय विजयकुमार कस्तुरे, वय 55 वर्ष, पद - नगर रचनाकार वर्ग 2 यांनी नगरचना अहमदपूर चा अतिरिक्त चार्च असताना काकासाहेब सिध्देश्वर डोईफोडे, वय 39 वर्षे, पद - मुख्याधिकारी, वर्ग 1, नेमणूक - नगरपरिषद, अहमदपूर यांच्या साठी आणि स्वत:साठी मौजे मरशिवणी ता. अहमदपूर जि. लातूर येथील सर्वे नंबर 56 मधील 3600 चौ.मी. क्षेत्रास वाणिज्य प्रयोजनार्थ जमीन विकासाची प्राथमिक परवानगी प्राप्त झालेली असून त्यामध्ये अंतिम परवानगी मिळण्याकरिता नगर परिषद अहमदपूर जि.लातूर येथे दाखल केलेल्या प्रलंबित कामाकरिता ५लाख रुपयाचा लाच मागतल्या प्रकरणी लातूर लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडल्याने एकचं खळबळ उडाली आहे.
यातील तक्रारदार यांच्या मौजे मरशिवणी ता. अहमदपूर जि. लातूर येथील सर्वे नंबर 56 मधील 3600 चौ.मी. क्षेत्रास वाणिज्य प्रयोजनार्थ जमीन विकासाची प्राथमिक परवानगी प्राप्त झालेली असून त्यामध्ये अंतिम परवानगी मिळण्याकरिता नगर परिषद अहमदपूर जि.लातूर येथे दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये दि. 25/10/2023 रोजी तक्रारदार यांनी ऑनलाइन चालान भरणा केलेला आहे.
तक्रारदार हे त्यांचे प्रलंबित कामाकरिता दिनांक 05/02/2024 रोजी नगर परिषद कार्यालय, अहमदपूर येथे गेले असता वर नमूद लोकसेवक अजय विजयकुमार कस्तुरे, वय 55 वर्ष, पद - नगर रचनाकार वर्ग 2, नेमणूक- जिल्हाधिकारी कार्यालय, नगर रचना विभाग, लातूर, अतिरिक्त कार्यभार नगरपरिषद, अहमदपूर ता.अहमदपूर, जि.लातूर यांनी तक्रारदार यांना त्यांचे प्रलंबित कामाकरिता स्वतःसाठी व मुख्याधिकारी नगरपरिषद अहमदपूर यांच्यासाठी असे मिळून एकूण 7,00,000 रुपये लाचेची मागणी केली.
आज दि. 14/02/2024 रोजी शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक काकासाहेब सिध्देश्वर डोईफोडे, वय 39 वर्षे, पद - मुख्याधिकारी, वर्ग 1, नेमणूक - नगरपरिषद, अहमदपूर ता.अहमदपूर, जि.लातूर व अजय विजयकुमार कस्तुरे, वय 55 वर्ष, पद - नगर रचनाकार वर्ग 2, नेमणूक- जिल्हाधिकारी कार्यालय, नगर रचना विभाग, लातूर, अतिरिक्त कार्यभार नगरपरिषद, अहमदपूर ता.अहमदपूर यांनी 7,00,000/- रूपये लाचेची मागणी केल्याचे व तडजोडी अंती 5,00,000/- रूपये स्विकारण्याचे मान्य केले.
त्यानंतर थोड्यावेळाने तक्रारदार नगरपरिषद, अहमदपूर येथे गेले असता आलोसे अजय विजयकुमार कस्तुरे, वय 55 वर्ष, पद - नगर रचनाकार वर्ग 2, नेमणूक- जिल्हाधिकारी कार्यालय, नगर रचना विभाग, लातूर, अतिरिक्त कार्यभार नगरपरिषद, अहमदपूर ता.अहमदपूर यांनी तक्रारदार यांच्या क्रेटा कारमध्ये लाचेची रक्कम 5,00,000/- रूपये शासकीय पंचांसमक्ष स्वतः स्विकारली आहे.
दोन्ही आरोपीस सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले आहे. पोलीस स्टेशन अहमदपूर जि. लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया चालू आहे.
➡ *मार्गदर्शक:-*
डॉ. राजकुमार शिंदे , पोलीस अधीक्षक,
अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड
(मो.नं. 9623999944)
श्री रमेशकुमार स्वामी
अपर पोलीस अधीक्षक
अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र, नांदेड
➡ *पर्यवेक्षण अधिकारी:-*
भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक,
अँटी करप्शन ब्यूरो, लातूर
(मो.नं. 9921139797)
➡ *सापळा पथक:-*
अन्वर मुजावर, पोलीस निरीक्षक व टीम
अँटी करप्शन ब्यूरो, लातूर
➡ *तपास अधिकारी:-*
भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक,
अँटी करप्शन ब्यूरो, लातूर.
-------------------------------------------------
*लातूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.*
अँटी करप्शन ब्यूरो, लातूर कार्यालय दुरध्वनी - *02382-242674*
@ टोल फ्रि क्रं. 1064