उद्योग मंत्री उदय सामंत यांचा मंगळवारी लातूर दौरा
लातूर, दि. १२ (जिमाका) : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे मंगळवार, १३ फेब्रुवारी २०२४ रोजी लातूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
उद्योग मंत्री श्री. सामंत यांचे १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होईल व लातूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील व राखीव. सकाळी १०.३० वाजता त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन सभागृहात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि उद्योग विभागाची मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम विषयी आढावा बैठक होईल. सकाळी ११.३० वाजता दयानंद महाविद्यालय मैदानावर अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे विभागीय नाट्य संमेलन आणि महासंस्कृती महोत्सव उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहतील. दुपारी १ ते १.३० पर्यंत राखीव. दुपारी १.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन सभागृहात लातूर जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांसमवेत चर्चा करतील.
उद्योग मंत्री श्री. सामंत यांची दुपारी २ वाजता पत्रकार परिषद होईल. दुपारी २.३० वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक होईल. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता लातूर विमानतळाकडे प्रयाण करतील. सायंकाळी ४ वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.