छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला
जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण
लातूर दि. 19 (जिमाका): शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी उपस्थितांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
**