केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर दि. 21 (जिमाका): केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे 23 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
केंद्रीय मंत्री ना. गडकरी यांचे 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता लातूर विमानतळावर आगमन होईल. सकाळी 11.05 वाजता ते हेलिकॉप्टरने अहमदपूर तालुक्यातील रुद्धाकडे प्रयाण करतील. सकाळी 11.50 वाजता अहमदपूर तालुक्यातील भक्तीस्थळ येथे भेट देतील. दुपारी 12.15 वाजता भक्ती स्थळ येथे आयोजित लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या भूमिपूजन सोहळ्यास ते उपस्थित राहतील. दुपारी 1.30 वाजता हेलिकॉप्टरने लातूर विमानतळाकडे प्रयाण करतील. दुपारी 2 वाजता लातूर येथून विमानाने पुणेकडे प्रयाण करतील.