Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

दिग्गजांच्या हस्ते लातुर येथील डॉ . प्रमोद घुगे यांच्या आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन संपन

दिग्गजांच्या हस्ते लातुर येथील डॉ . प्रमोद घुगे यांच्या आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन संपन्न




-- लातूर येथील पहिल्या किडनी प्रत्यारोपण सेंटरचे तथा आयकॉन सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे समाजातील सर्वच स्तरातील नामांकितांच्या हस्ते उद्घाटन पार पडले.एकाच छताखाली सर्व सुविधांची उपलब्धी होणार असलेल्या या भव्य-दिव्य हॉस्पिटलचे उद्घाटन अगदी थाटामाटात संपन्न झाले. उद्घाटन समारंभ दरम्यान विविध रंगतदार कार्यक्रमांसह स्नेहभोजनाच्या दर्जेदार मेजवानीसह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. या दैदिप्यमान सोहळ्याचे उद्घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री मा.ना.श्री.डॉ. भागवतरावजी कराड यांच्या हस्ते करण्यात आले असून अध्यक्ष म्हणून लातूर येथील सहकार महर्षी तथा माजी राज्यमंत्री श्री.दिलीपरावजी देशमुख उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणून मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय सुप्रसिद्ध अभिनेते श्री.मकरंदजी अनासपुरे यांच्यासह डॉ.सुधीरजी निकम हे लाभले होते . शिवाय प्रमुख उपस्थितीत उमरगा येथील आ.ज्ञानराज चौघुले, किडनी प्रत्यारोपण अखिल भारतीय संशोधन केंद्राचे सर्वेसर्वा डॉ.विवेकजी कुटे अहमदाबाद,‌आयकल आयुक्त पुणे श्री.मुकुंद चाटे यांच्यासह माजी खासदार श्री.सुनिल गायकवाड, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, त्र्यंबकआण्णा भिसे, नारायणराव (आबा) पाटील, प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ.विठ्ठलरावजी लहाने, कॉग्रेसचे जेष्ठ नेते तथा प्रख्यात सामाजिक वक्ते दादासाहेब मुंडे, आय.एम.ए.डॉक्टर संघटनेचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉ.भराटे, डॉ.जटाळ, डॉ.किणीकर, डॉ.अंबाजोगाई आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ.नवनाथरावजी घुगे, डॉ.विनायकजी सिरसाट, डॉ.सतिशजी गुट्टे यांच्यासह ई. अनेक डॉक्टर, पत्रकार, उद्योजक, सामाजिक-राजकीय पदाधिकारी मंडळींची उपस्थिती होती. या अनोख्या अशा भव्य-दिव्य उद्घाटन सोहळ्यास लातूरसह भोवतालच्या बीड-धाराशीव-परभणी जिल्ह्यासह पंचक्रोशीतून मोठ्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होता.‌ आयकॉनचे संचालक दाम्पत्य डॉ. प्रमोद घुगे व डॉ.सौ.प्रतिभा प्रमोद घुगे यांच्यासह जेष्ठ बंधू विनोद घुगे, सौ.वैशाली विनोद घुगे आई श्रीमती.अनुसया घुगे, डॉ.महेंद्र केंद्रे व संपुर्ण घुगे-केंद्रे परिवार उपस्थित होता. कार्यक्रमा अगोदरच्या मराठवाड्यातील सुप्रसिद्ध गायक स्वररत्न श्री.सुभाषरावजी शेप यांच्या बहारदार संगीत रजनीने उपस्थित जनसमुदाय मंत्रमुग्ध होऊन गेला. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयकॉन हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी तथा जेष्ठ पत्रकार श्री.सुनिल सिरसाट, श्री.बालाजी सुळ आणि श्री.भैरवनाथ कानडे यांनी केले.



Previous Post Next Post