Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

फुकटच्या प्रसिध्दी मध्ये रमले प्रशासन..!कृषी महोत्सव असो..वा १००व्वे नाट्य सम्मेलन १०पैशे खर्च करुन १रुपया दाखविण्यावर प्रशासनाचा भर.

फुकटच्या प्रसिध्दी मध्ये रमले प्रशासन..!कृषी महोत्सव असो..वा १००व्वे नाट्य सम्मेलन 
१०पैशे खर्च करुन १रुपया दाखविण्यावर प्रशासनाचा भर..







लातूर -शासन - प्रशासन शेतकऱ्यांप्रती किती गंभीर याचा प्रत्यय कृषी महोत्सवा च्या कार्यक्रमा मध्ये आला आहे.लातूर येथे कृषी विभागाच्या वतीने जिल्हास्तरीय कृषी महोत्सव भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले असून शेतकरी उपस्थित राहतील अशी संयोजकांना अपेक्षा होती. भव्य सभामंडप, आखीव रेखीव स्टॉल्स, vip बैठक व्यवस्था, पोलीसचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.परंतू पालकमंत्री, खात्याचे मंत्री, जिल्ह्यातील मंत्री आमदार खासदार यांनी या कार्यक्रमास पाठ फिरवल्याने जिल्हा प्रशासनाची मात्र नाचक्की झाली आहे.त्याला जबाबदार जिल्हा कृषी अधिकारी आणि त्यांची पिल्लावळ असून दोन चार बॅनर प्रिटींगच्या जोरावर जिल्हाभर प्रसिद्धि होईल या आत्मविश्वासाने कार्यक्रम आखण्यात आला.या कृषी अधिक्षकांच्या आणि त्यांच्या पिल्लावळांच्या आडमुठी भुमीकेमुळे कार्यक्रमाचा फज्जा उडाला असून नाम मात्र शेतकर्यांनी हजेरी लावल्याने प्रशासनाची फजीती उडाली. 
आता पुन्हा तीच चुक १००व्वे नाट्य सम्मेलनामध्ये जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे ह्या करत आहेत.तब्बल दोन करोड रुपये खर्च असलेला हा कार्यक्रमास सुध्दा प्रसिद्धि साठी १०पैशे ही खर्च न ठेवता तुटपुंजा बॅनर बाजीवर कार्यक्रम आटपून घेण्याचा प्रयत्न चालू आहे.विशेष म्हणजे एकाच ठिकाणी कार्यक्रम न घेता विविध ठिकाणी कार्यक्रम ठेवून कार्क्रमाचा उत्साह कमी करण्यात येत आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्व भुमीवर बजेट संपवण्यावर प्रशासनाचा कल दिसत असून १०पैशे खर्च करुण १रुपया दाखवण्यावर भर दिला जात असल्याचे आता स्पष्ट दिसत आहे.एवढ्यावरच न थांबता आता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे ह्या आमदार,खासदारांच्या फंडालाही कात्री लावणार असल्याचे भर पत्रकार परिषदे मध्ये सांगीतले आहे.दगडोजीराव सभाग्रह आणि दयानंद सभाग्रह,तिन दिवसाचा बोलवण्यात आलेल्या कलाकारांचे राहणे आणि खाणे या सर्वाचा ढोबळ हिसाब केला तर १करोड रूपयेचा खर्च डोक्यावरुन जात आहे बाकी उरलेले पैशे न विचारलेले बरं..! त्यानंतर कमी पडले तर आमदार,खासदार फंड आहेचं.. घेण्यासाठी ,हा पायंडा मागील दोन जिल्हाधिकारी यांनी घातलेला असून याबाबत सर्व लातूरकरांना माहिती आहे आणि असेच पुढे चालू राहिले तर शासनाचा एक रुपयाही सर्वसामान्य नागरिकांवर खर्च होईल या बाबत शंका उपस्थित होत आहे.जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना जिल्हा रुग्णालयसाठी २करोड रूपयाची अवश्यता असून याचे काम केंव्हा होईल असे विचारले असता टेक्निकल प्राॅब्लम आहे असे म्हणून सावरासावरी केली.अतिशय महत्वाचा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा जिव्हाळयाचा प्रश्न मात्र अन्नुत्तरित राहिला याचे मात्र वाईट वाटते. आता प्रशासन फुकटच्या प्रसिध्दी मध्ये रमले असून..!त्यामुळे त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या जिवाशी काहीही घेणे देणे नाही त्यामुळे १०पैशे खर्च करुन १रुपया दाखविण्यावर प्रशासन भर देत आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही
Previous Post Next Post