Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव सोसायटीचा उडाला बोजवारा;तब्बल ३००करोड रुपयाच्या ठेवी अडकल्या

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

चेअरमन फरार...!
राजस्थानी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव सोसायटीचा उडाला बोजवारा;तब्बल ३००करोड रुपयाच्या ठेवी अडकल्या

मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणुन करण्यात आलेली सही चेरमन आणि संचालक मंडळाच्या दबावाखाली ..?

ठेवीदारांचे ५ फेब्रुवारी पासून तहसिल कार्यालयासमोर साखळी उपोषण





लातूर- (प्रतिनिधी): राजस्थान मल्टीस्टेट को-ऑपरेटिव सोसायटीचा बोजवारा उडाला असून तब्बल ३००करोड रुपयाच्या ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या असून याबाबत काही दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्रात बातम्या प्रकाशित होत आहेत .आता या प्रकरणाला नविन वळण लागले आहे .जिल्हाधिकारी यांना मल्टीस्टेट ने ठेवीदारांच्या ठेवी फेब्रुवारी पासून वाटप करण्यात येईल असे लेखी दिले होते त्यानंतर राजस्थानी मल्टीस्टेटने ठेवीदारांच्या ठेवी दिल्या नाहीत. त्या निवेदनात मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणुन ज्यांची सही आहे हि सही चेअरमन यांच्या दबावाखाली येवून दिली असून वास्तविक त्याचे सर्व अधिकार २०२२ रोजी संचालक मंडळाने काढून घेतले होते आणि त्यांच्या जवळील असलेली जबाबदारी हि दुसर्यांना देण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
त्यावर मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणुन सही असल्याने त्यांची नाहक बदनामी होत आहे व त्यांच्या जिवीतास धोकाही निर्माण झाला आहे..हे जर खरे असेल तर यामागचा मुख्य सुत्रधार कोण आहे?यांची ही चौकशी प्रशासनाने करावी.
मागील काही वर्षापासून चेअरमन यांनी काही संचालक मंडळाला विश्वासात न घेता मनमानी कारभार चालवला होता.परंतू ठेवीदारांनी राजस्थानी मल्टीस्टेट चेअरमन व संचालक मंडळावर विश्वास ठेवून तब्बल ३०० कोटी रूपयाच्या ठेपी ठेवल्या ह्या ठेवीचा  २०१२ ते २०१६ या कालावधीत नियमबाह्य पध्दतीने कर्ज वाटप केल्याचा आरोप होत आहे.चेअरमन व काही संचालकांच्या मनमानी कारभारामुळे आज तब्बल ३००कोटी रुपयांच्या ठेवी अडकल्या आहेत या प्रकारानंतर चेअरमन फरार झाल्याची बातमी वार्यासारखी पसरल्याने एकच खळबळ उडाली आणि ठेवीदारांमध्ये संतापाची लाट पसरली.या प्रकरणामुळे राजस्थानी मल्टीस्टेटवरचा संपुर्ण विश्वास उडाला.यानंतर ठेवीदारांची बैठक होपून दि.०५ फेब्रुवारी रोजी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून या बाबत ठेवीदारांनी संबंधीत अधिकान्याना निवेदनही दिले असल्याचे समजते.
९१ दिवसाच्या ठेवीवर १०%व्याजाच्या अमिषाला बळी पडून ठेवीदारांनी करोडोरुपये ठेवले परंतू चेअरमन आणि संचालक मंडळाच्या मनमानी कारभाराचा फटका आज सर्वसामान्य गोरगरिब ठेवीदारांना बसत आहे.



Previous Post Next Post