गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
लातूरमध्ये एका नागरी सहकारी पतसंस्थेत अर्थिक गैरव्यव्हार! दोघां जणांनवर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार
लातूर -नुकतेच परळी येथील राजस्थान मल्टीस्टेट को-ऑपरेटिव सोसायटीचा बोजवारा उडाला असून तब्बल ३००करोड रुपयाच्या ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या असून याबाबत काही दिवसांपासून संपुर्ण महाराष्ट्रात बातम्या प्रकाशित होत आहेत हि बातमी ताजी असताना आता हि लातूरमध्ये कार्यरत असलेली माहेश्वरी बहुउद्देशीय नागरी सहकारी पतसंस्थेत अर्थिक गैरव्यव्हार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली असून संस्थेचे व्यवस्थापक, भिमाशंकर निळकंठराव पाटील व हिशोबनिस / रोखपाल सोमनाथ गोरख पंडीत यांनी संगनमताने संस्थेत बरेच आर्थिक गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक तपासणीवरुन निदर्शनास आलेले असल्याचे सांगण्यात आले आहे.या दोन्ही कर्मचार्यांना संस्थेने निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे.
काही दिवसापुर्वी माहेश्वरी बहुउद्देशीय नागरी सहकारी पतसंस्थेने याबाबत एका पेपरला जाहिर प्रगटन देण्यात आले असून यामध्ये दोघां जणांनवर पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिल्याचेही सांगीतले आहे.
वरील दोघांनी संगनमतानी संगणकात देखील रोजच्या व्यवहारातील नोंदीत स्वतःचा आर्थिक फायदा करण्याच्या हेतूने फेरबदल करुन बेकायदेशीर व्यवहार संस्थेच्या खात्यावर व संस्थेच्या ठेवीदार, खातेदार व कर्जदार यांच्याही खात्यावर केल्याचे निदर्शनास आलेले आहे. वरील दोघांनीही मोठ्या प्रमाणात आर्थिक अफरातफर केल्याचे निदर्शनास आलेले आहे. तसेच संस्थेची बरीचशी महत्वाची कागदपत्रे व रेकॉर्डही संस्थेतून गायब केलेले असल्याचे जाहिर प्रगटनाद्वारे सांगण्यात आले आहे.
पहा याबबात चे जाहिर प्रगटन
"आम्ही माहेश्वरी बहुउद्देशीय नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत लातूर चे संचालक मंडळाव्दारे लातूर जिल्हा व परीसरातील सर्व जनतेस या प्रगटनाव्दारे कळवितोत की,
आमची संस्था बँकींग क्षेत्रात लातूर येथे काम करते. आमच्या संस्थेचे व्यवस्थापक, भिमाशंकर निळकंठराव पाटील व हिशोबनिस / रोखपाल सोमनाथ गोरख पंडीत यांनी संगनमताने आमच्या संस्थेत बरेच आर्थिक गैरव्यवहार केल्याचे प्राथमिक तपासणीवरुन निदर्शनास आलेले आहे. वरील दोघांनी संगनमतानी संगणकात देखील रोजच्या व्यवहारातील नोंदीत स्वतःचा आर्थिक फायदा करण्याच्या हेतूने फेरबदल करुन बेकायदेशीर व्यवहार संस्थेच्या खात्यावर व संस्थेच्या ठेवीदार, खातेदार व कर्जदार यांच्याही खात्यावर केल्याचे निदर्शनास आलेले आहे. वरील दोघांनीही मोठ्या प्रमाणात आर्थिक अफरातफर केल्याचे निदर्शनास आलेले आहे. तसेच संस्थेची बरीचशी महत्वाची कागदपत्रे व रेकॉर्डही संस्थेतून गायब केलेले आहेत. आमच्या संस्थेने गांधी चौक, पोलिस स्टेशन, लातूर येथे रीतसर तक्रार ही नोंदवलेली आहे.
आमच्या संस्थेने वरील दोन्ही कर्मचा-यांना निलंबीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आम्ही या प्रगटनाव्दारे सर्व जनतेस कळवितो की, वरील दोघां बरोबर ही संस्थेशी निगडीत व्यवहार करु नये. तसेच आम्ही वरील दोघां विरुध्द ही रीतसर कायदेशीर कार्यवाही करीत आहोत. भिमाशंकर निळकंठराव पाटील हे आमच्या संस्थेचे कर्जदार ही आहेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार भिमाशंकर निळकंठराव पाटील हे त्यांची लातूर जिल्हा व परीसरात असलेल्या स्थावर मिळकती हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रगटनाव्दारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, भिमाशंकर निळकंठराव पाटील यांचे सोबत त्यांच्या स्थावर मिळकती विषयी कोणताही व्यवहार आमच्या संस्थेच्या संमतीशिवाय करु नये. आमच्या संस्थेच्या संमतीशिवाय कोणीही त्यांच्याशी व्यवहार केल्यास तो आमच्या संस्थेच्या हक्क अधिकारावर बंधनकारक राहणार नाही.
सबब हे जाहीर प्रगटन.