Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पुण्याच्या आयटी पार्क हिंजवडी परिसरात ५००च्या बनावट नोटा छापणार्या टोळीचा पर्दाफाश..!

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
पुण्याच्या आयटी पार्क हिंजवडी परिसरात ५००च्या बनावट नोटा छापणार्या टोळीचा पर्दाफाश..!



"यापूर्वी डिसेंबर २२मध्ये कुर्डुवाडीतील टेंभुर्णी चौकात ग्रामीण गुन्हे शाखेने चौघांना अटक केली होती. या लोकांनी उरळी देवाची येथून प्रिंटर मशिन व सामान आणून ५०० रुपयांच्या १० नोटा तयार केल्या होत्या. ऑक्टोबर २०२२ मध्ये महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) बांगलादेशातून बनावट नोटांची तस्करी आणि तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक केली होती. फेब्रुवारी २०२४ मध्ये हिंजवडी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून १लाख २० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी पुणे टेरिटोरियल युनिटच्या अधिकाऱ्यांनी तस्करीच्या भारतीय बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व घटना पाहता पुणे हे बनावट नोटाचे केंद्र बनते की काय?अशी शंका आता निर्माण होत आहे.पोलिस आपले कार्य करत असले तरी सर्वसामान्य नागरिकांनी आता सतर्क होण्याची गरज निर्माण झाली आहे.
पुणे : पुण्याच्या आयटी पार्क हिंजवडी परिसरात तीन तरुणांनी घरातच बनावट चलनी नोटा छापल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून त्या तरुणांनी 
 या बनावट चलनी नोटा घेऊन माण गावात जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्या पैकी एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले असून, या तिघांकडून 1 लाख 20 हजार रुपये किमतीच्या 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. 

घरातच या नोटा छापल्या पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या नोटांची उत्कृष्ठ क्वॉलिटी पाहता यामध्ये परराज्य अथवा परदेशातील काही लोकांचा सहभाग आहे का हे पडताळून पाहिले जात आहे. शुक्रवारी (16 फेब्रुवारी) दुपारी बोडकेवाडी फाटा, माण हिंजवडी रोड येथे पोलीसांनी ही कारवाई केली. अभिषेक राजेंद्र काकडे (वय 20), ओंकार रामकृष्ण टेकम (वय 18, दोघे रा. हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार श्रीकांत चव्हाण यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे."


कशा ओळखायच्या बनावट नोटा?

-वॉटरमार्क म्हणजे नोटेवरील चित्राची प्रतिकृती असून ती नोटेच्या दोन्ही बाजूला दिसते. वॉटरमार्क गहाळ असल्यास किंवा पोर्ट्रेटशी जुळत नसल्यास नोट बनावट असण्याची शक्यता असते.
-सर्व भारतीय नोटांमध्ये एक सुरक्षा धागा असतो जो नोटेच्या माध्यमातून उभा चालतो. प्रकाशासमोर ठेवल्यावर धागा स्पष्ट दिसतो आणि त्यावर नोटेचा भाव छापला जातो.
-सी-थ्रू रजिस्टर ही नोटेच्या डाव्या बाजूला असलेली एक छोटी खिडकी आहे. रजिस्टरमध्ये एक मूल्य क्रमांक छापलेला असतो, जो नोटेच्या दोन्ही बाजूंनी पाहता येतो. रजिस्टर गहाळ असेल किंवा योग्य आकडा नसेल तर नोट बनावट असण्याची शक्यता असते.




Previous Post Next Post