श्री खाटूश्याम मंदिरच्यावतीने महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन
लातूर : लातूर शहरापासून जवळच असलेल्या सिकंदरपूर रोडवर नव्याने निर्माण होत असलेल्या श्री खाटूश्याम मंदिराच्या मूर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठापना उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवार , दि. ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजता बालाजी मंदिर, पापविनाश रोडवरील सत्संग भवन याठिकाणी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री खाटूश्याम मंदिर फाऊंडेशनच्या वतीने सिकंदरपूर रोडवर भव्य दिव्या श्री खाटूश्याम मंदिराची उभारणी पूर्णत्वास आली आहे. या मंदिरात श्री खाटूश्यामजी सोबतच श्री गणेशजी, श्री सालासर बालाजी, श्री राणी सती दादीजी, श्री शंकर भगवानजी, श्री रामदेवबाबाजी, श्री विठ्ठल रुक्मिणीजी या सर्व देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना येत्या दि. २२ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे. या उत्सवाची सुरुवात दि. १६ फेब्रुवारी पासून होणार आहे. या संपूर्ण उत्सवाच्या पूर्वतयारीनिमित्त मंगळवार , दि. ६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या सत्संग भवनच्या बैठकीस सर्व भाविक भक्तांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुरेंद्रकुमार शाह , राजेश अग्रवाल, राजेश मित्तल, राजेश अग्रवाल सीए , विकास ( बबलू ) अग्रवाल , मुकेश मित्तल, संतोष शर्मा, विनोद ब्रिजवासी, राजकमल अग्रवाल, विपीन अग्रवाल, सुमित अग्रवाल, रवी अग्रवाल, दीपक पिट्टी, कमलकिशोर अग्रवाल, आनंद अग्रवाल, नंदकिशोर अग्रवाल, नंदकिशोर पपरुनिया आदी मान्यवरांनी केले आहे.