गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
एलआयसी कॉलनीतील हनुमान मंदिराभोवतीचे कम्पाउंड तोडून कब्जा करण्याचा प्रयत्न; विवेकानंद ठाण्यात २५ जणांवर गुन्हा
लातूर : एलआयसी कॉलनीत हनुमान मंदिराभोवती असलेले तारेचे कम्पाउंड तोडून कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात २५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मागील काही वर्षा पासून १८००चौ फुट जागेचा वाद चालू असून हा वाद महानगरपालिका आणि कोर्टात सुध्दा चालू असल्याचे सांगीतले जात आहे.तेथील नागरिकांच्या म्हणन्यानुसार हि जागा ग्रीन बेल्ट ची असून,मंदीर याच ग्रीन बेल्ट मध्ये बांधण्यात आले आहे.परंतू कब्जा करणार्यांच्या म्हणन्यानुसार हि जागा त्यांची स्वत:ची असल्याचे सांगण्यात येत आहे.हा वाद विकोपाला गेला असून
दि. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास एलआयसी कॉलनीतील रुद्रेश्वर चौकाच्या पूर्वेस कपेश्वर हनुमान मंदिरासमोर येऊन आरोपींनी मंदिराभोवतीचे तारेचे कम्पाउंड तोडले व अनधिकृत प्रवेश केला. सोबत त्यांनी जवळपास १०० पत्रे व अँगल आणले होते. आरोपी २० ते २५ जण असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यावेळी आजूबाजूच्या परिसरातील जमलेल्या रहिवाशांना धमकावले. त्यात महेश पुरी यांचा हात फॅक्चर झाला. सूरज माळी व अभिषेक गिरी यांनाही मारहाण केली.याप्रकरणी फिर्यादी श्रीकृष्ण रणदिवे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शेख युसूफ जाफर, बालाजी पवार, अफसर शेख, रसूल शेख, बबलू, तय्यब शेख व अनोळखी २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिक तपास पोउपनि, अनिल कांबळे हे करीत आहेत.