गडकरी साहेब...आपण हेलिकॉप्टर ने जाणार...आम्ही पत्रकारांनी कशाने जायचे!
रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, भारत सरकार आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग ३६१ व ६३ चे लोकार्पण आणि राष्ट्रीय महामार्ग ७५२ k आणि ६३ चे भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
माननीय श्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, भारत सरकार यांच्या शुभ हस्ते दिनांक २३ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता भक्ती स्थळ, अहमदपूर, ता. अहमदपूर, जिल्हा लातूर येथे होणार आहे. सोबत निमंत्रण पत्र जोडलेले आहे. कृपया सर्व प्रसार माध्यम प्रतिनिधींनी वरील कार्यक्रमास उपस्थित राहावे, ही विनंती. अशा प्रकारचे निमंत्रण क्षेत्रिय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांच्या स्वाक्षरीने प्रसारित करण्यात आले आहे.त्यांनी दिलेले दोन्ही मोबाइल नं उचलत नसल्या कारणाने लातूर शहरातील पत्रकार संभ्रमात असून शहरातील पत्रकारांसाठी कसल्याही प्रकारची सुविधा क्षेत्रिय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, सोलापुर यांनी उपलब्ध करुन दिली नाही किंबहुना अशी कसलीही सुविधा या कार्यालयाने करण्यात आल्याचे सांगीतले नाही त्यामुळे शहरातील पत्रकारांमध्ये नाराजगीचा सुर उमटला आहे.गडकरी साहेब...आपण हेलिकॉप्टर ने जाणार...आम्ही पत्रकारांनी कशाने जायचे! अशी तिव्र भावना व्यक्त होताना दिसत आहे.
शासन आणि प्रशासन मिळून कार्यक्रम आयोजन करत असताना संविधानाचा चौथा स्तंभ मात्र कायम दुर्लक्षीत करण्यात येत आहे.आमंत्रण तर येताता मात्र सुविधा देण्याच्या नावावर बोंबाबोंब करण्यात येते, माननीय गडकरी साहेबांनी याची गंभीर दखल घेवून अशा निकृष्ट अधिकार्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी पत्रकारांमध्ये जोर धरु लागली आहे.