गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
वलांडी येथील नराधमाने केलेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ लातूर शहरात बंद व आक्रोश मोर्चा
लातूर : मौजे वलांडी येथील अत्यंत गरीब, मागासवर्गीय कुटुंबातील ६ वर्ष वयाच्या लहान मुलींवर निर्दयी आरोपीने ४ ते ५ दिवस अत्याचार केला आहे. त्याबाबतचा गुन्हा क्रमांक २८/२०२४ दि.२५.०१.२०२४ रोजी कलम ३७६ अ, ब २एन,३७७,५०६ अट्रोसिटी ३(१), डब्लू,३(२), तसेच बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम ४,६ अंतर्गत गुन्हे दाखल करून आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.
पिडीत कुटुंबात वयोवृध्द आजाराने ग्रस्त सासु, सासरे, एक विधवा महीला व त्यांच्या ४ लहान मुली, एक लहान मुलगा असा परिवार असून सर्व कुटुंबियांचा उदरनिर्वाह पीडितेच्या विधवा आईवरच आहे, जी मोलमजुरी करून उदनिर्वाह भागविते.
१) पिडीत व आरोपीचे घर एकमेकांच्या समोर आहे त्यामुळे पिडीत कुटुंबाची सोय इतरत्र करावी अथवा पिडीत कुटुंबीयास पोलीस संरक्षण देण्यात यावे.
२) पिडीत कुटुंबीयास शासनाच्या वतीने योग्य ती आर्थिक मदत करण्यात यावी
३) पिडीत बालिकेच्या पुनर्वसनाचा (शैक्षणिक आदी) संपूर्ण खर्च शासनाने उचलावा
४) सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा
५) पिडीत कुटुंबियात अल्पवयीन ४ मुली, १ मुलगा असल्याने त्यांना बाल संगोपन योजने अंतर्गत (विशेष बाब म्हणून) सर्वांना मदत करण्यात यावी
६) पिडीतेच्या आईला शासकीय, निमशासकीय नौकरीत सामावून घेण्यात यावे अथवा सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय शेत जमीन देण्यात यावे
७) संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागे पर्यंत आरोपीला व कुटुंबीयांना गाव बंदी करण्यात यावी जेणेकरून गावात धार्मिक/जातीय तेढ अथवा तणाव निर्माण होणार नाही याची काळजी प्रशासनाच्या वतीने घेण्यात यावी.
या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी लोकशाही मार्गाने शांततेत दि.०५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आई जगदंबा मंदिर गोलाई लातूर पासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक लातूर येथ पर्यंत हिंदु आक्रोश मोर्चा पोहचून जुने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रशासनास लहान मुलीच्या वतीने निवेदन वाचन करून, निवेदन देवुन सांगता होणार आहे.
तसेच लातूर शहरातील सर्व सजग व्यापारी मित्रांनी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत अशा घटनांचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपली व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून मोर्चात सहभागी होण्याची विंनती हिंदु आक्रोश मोर्चा, सामाजिक संघटनेच्या संयोजकांनी केली आहे (कृपया बातमी मध्ये कोणाचे ही नाव अथवा संघटना छापू नये)