गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
पोलिस स्टेशनच्या गेटवरच बोकडाचा बळी!अजब प्रकाराने हादरला महाराष्ट्र
उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन च्या समोर बोकडाचा बळी! देवून अंधश्रद्धेला खतपणी घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून ही बातमी लातूर जिल्ह्यामध्ये चं नव्हे तर संपुर्ण महाराष्ट्रात वार्यासारखी पसरली
उदगीर मध्ये दिवसेंदिवस पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असल्याने त्यावर उपाय शोधत ठाण्याच्या गेटवरच पोलिसांनी बोकड कापून शांती केली. अंधश्रद्धेचा हा धक्कादायक प्रकार उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यामध्ये घडला. वर्षभरापूर्वी एका अधिकाऱ्याने या पोलिस ठाण्याचा पदभार घेतला. मात्र, कारभार हाती घेतल्यापासून ठाण्याच्या हद्दीत अपघात व गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले. यावर उपाय शोधण्यासाठी बोकडाचा बळी देण्याची भन्नाट कल्पना एका अधिकाऱ्याच्या सुपीक डोक्यातून बाहेर आली. त्यामुळे या वरिष्ठ अधिकाऱ्याने क्रमांक तीनच्या अधिकाऱ्यांवर बोकड आणण्याची आणि पुढील विधी पार पाडण्याची जबाबदारी सोपवली. त्यानुसार अधिकाऱ्यांनी तयारी सुरू केली. त्यानुसार एका अधिकाऱ्याने एक बोकड आणि त्याला कापणारा कसाई यांना पोलिस ठाण्यात आणले. आणि त्या बोकडाचा पोलिस ठाण्याच्या गेटवरच बळी देण्यात आला घटना घडली तपास चालु आहे आमच्या ठाण्यात जातीयवाद आणि गटबाजी आहे. अनेक लॉबी या पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत. वर्षभर मी कुणालाही बेकायदेशीर काम करू दिलेले नाही. त्या रागातून किंवा गटबाजीतून हा फोटो व्हायरल केला असावा. मात्र, हा प्रकार घडला तेव्हा मी पोलिस ठाण्यात नव्हतो. उपविभागीय पोलिस अधिकारी आता येथे आले आहेत तपास चालु असल्याचे अरविंद पवार, पोलिस निरीक्षक, उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन यानी एका चैनल ला सांगितले
परंतू एवढ्यावरच ते न थांबताय ाचे फोटोसेशन करून हा बोकड मलकापूर शिवारातील एका राजकीय पुढाऱ्याच्या फार्म हाऊसवर नेण्यात आला, त्यानंतर . तेथे बनवण्यात आलेल्या बिर्याणीवर सायंकाळी अधिकाऱ्यांसह तिथे हजर असलेल्या सर्वांनी ताव मारला.
हि बातमी सर्वत्र पसरल्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी , उदगीर दिलीप भागवत यांनी प्रसारमाध्यमांना एक व्हिडीओ बनवून पाठवून दिला या मध्ये शक्कल लढवून चार चाकी गाडी नविन घेतल्याने त्याच्या पार्टी साठी हा प्रकार झाला असल्याचे सांगीतले खरे...मग बोकड पोलिस स्टेशन च्या समोर कापण्याचे काय कारण होते ,हा प्रश्न कायम अनुत्तरित राहत असल्याने उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन ची या प्रकारावर जोरदार चर्चा संपुर्ण महाराष्ट्रात होवू लागली आहे.