गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
'वंडरवर्ल्ड'च्या प्रकरणात; महानगरपालिकेला पाच हजार रुपयाचा दंड
लातूर : येथील विलासराव देशमुख पार्कमध्ये नागरिकांच्या मनोरंजनासाठी सुविधा देण्याचा ठेका वंडर वर्ल्ड नावाच्या संस्थेला देण्यात आला आहे. सदर ठेकेदाराला काढण्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने प्रयत्न केले. परंतु, जिल्हा न्यायालयाने वंडर वर्ल्डच्या बाजुने निकाल देत महापालिका प्रशासनाला ५ हजार रुपयांचा दंड देण्याचे आदेश दिले
आहेत, येथील विलासराव देशमुख पार्कमध्ये नागरिकांसह चिमुकल्यांचे मनोरंजन व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाने वंडर वर्ल्ड नावाच्या संस्थेला नऊ वर्षांसाठी ठेका दिला आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून नागरिकांच्या तक्रारीनंतर हा ठेका रद्द करून तेथून वंडर वर्ल्डला हटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याविरोधात वंडर वर्ल्डने जिल्हाधिकाऱ्यांकडे घाव
घेतली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी वंडर वर्ल्डविरोधात निकाल दिला होता. त्याला वंडर वर्ल्डच्या संचालिका सोनाली ब्रिजवासी यांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले होते. या प्रकरणाचा निकाल अवघा एका दिवसावर असताना पुन्हा महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पोलीस बंदोबस्त आणून चंडरवर्ल्डचे तेथील साहित्य उचलून फेकण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, दुसऱ्याच
दिवशी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी वंडरवर्ल्डच्या बाजुने निकाल दिला आहे. वंडरवर्ल्डच्या बाजुने अॅड. डी. के भालके यांनी बाजू मांडली. जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालात म्हटले आहे, सदर वंडरवल्र्ड संस्थेचा ठेका कायम ठेवावा. त्याचप्रमाणे वंडर वर्ल्ड संस्थेला ५ हजार रुपये महापालिकेने देण्याचे निकालात म्हटले आहे.