Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

वलांडी येथील बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ हाळी-हंडरगुळीत रास्तारोको..

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
वलांडी येथील बालिकेवरील अत्याचाराच्या निषेधार्थ  हाळी-हंडरगुळीत रास्तारोको..


 ———————————— हाळी_हंडरगुळी~> देवणी तालुक्यातील वलांडी येथील सहा वर्षीय चिमुकल्या मुलीवर 1 मुस्लिम नराधमाने अत्याचार केल्याचे उघड झाले आहे.व या निंदा व संतापजनक घटनेचा निषेध म्हणुन तसेच आरोपी - ला फाशीची शिक्षा व्हावी,म्हणुन दि ५/२/२४ सोमवार रोजी हाळी --हंडरगुळी ता.उदगीर येथे स.१० ते १२ वा.पर्यंत रास्तारोको हे आंदोलन करण्यात येणार आहे.व याबाबतचे लेखी निवेदन पोलिस ठाणे वाढवणा यांना देण्यात आले. . सदर घटनेबद्दल राज्यभरात तिव्र संताप पसरला असुन गावोगाव या संतापजनक व निंदाव्यजनक घटने बद्दल विविध समाजातील स्ञी-पुरुष रस्त्यावर उतरलेत.व आरोपीस फाशी द्या.अशी मागणी संतप्त नागरिक करु लागले असुन सदर घटनेच्या निषेधार्थ येत्या सोमवारी हाळी-हंडरगुळी ता. उदगीर येथे भव्य रास्तारोको करण्यात येत असल्याचे निवेदन पो.स्टे.वाढवणा येथे ठाणे अंमलदार सुर्यकर यांना देण्यात आले.यावेळी जेष्ठ पञकार तथा शिवसेना माजी जि.प.सर्कल प्रमुख पप्पू पाटील,चि.प्रेम पी.पाटील, राहूल सुर्यवंशी,सचीन शेळके,श्याम खोडेवाड,पवन बोळेगावे,व्यंकटेश जाधव,प्रतीक उडतेवार,विजय डोके, आकाश डोपेवाड,पवन कलवले,भुरे महेश,साई साळी,आदी युवाकार्यकर्ते निवेदन देतेवेळेस उपस्थित होते..
Previous Post Next Post