अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद पार पडली.
पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे:
➡️ राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मराठा आरक्षण देण्याचे काम झाले आहे: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
➡️ विरोधकांचे पत्र अंतिम आठवडा प्रस्तावाचा मसुदा. कशावर फोकस करावे, हे त्यांना समजेनासे झाले आहे. शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांवर सरकार गांभीर्याने काम करते आहे: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
➡️ विरोधक निराश अवस्थेत, आम्हाला मात्र राज्याला पुढे न्यायचे आहे: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
➡️ धानाच्या बोनसचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत झाला, मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
➡️ सागर बंगला हा सरकारी बंगला आहे,
सरकारी कामासाठी कुणीही तेथे येऊ शकते.
कुणाचीही अडवणूक होणार नाही.
माझ्यावरचे आरोप : जे ते बोलतात, ते धादांत खोटे आहे, हे त्यांनाही माहिती आहे.
मी मुख्यमंत्री असताना हायकोर्टात आरक्षण टिकविले आणि सुप्रीम कोर्टात सुद्धा टिकविले.
सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अशा अनेक योजना कुणी सुरू केल्या आणि त्यासाठी किती निधी दिला, हेही मराठा समाजाला ठावूक आहे.
कुणाच्या म्हणण्याने मराठा समाज खोट्या आरोपांवर विश्वास ठेवणार नाही.
जी स्क्रिप्ट उद्धव ठाकरे, शरद पवार कालपर्यंत बोलत होते, तीच स्क्रिप्ट आता अन्य कुणी बोलत आहेत. यामागे कोण हे योग्यवेळी समोर येईलच.
पण तोवर कायदा कुणी हाती घेतला, तर पोलिस योग्य कारवाई करतील: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस