गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
रेणापूर येथे भाजपा युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांच्या नेतृत्वात राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन
लातूर दि. ०९- जगातील लोकप्रिय नेते देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या बद्दल काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ रेणापूर येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने युवा नेते मा. ऋषिकेश दादा कराड यांच्या नेतृत्वात राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
येत्या काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देश माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदीजी होणार हे सूर्यप्रकाशा इतके सत्य असल्याने पराभवाच्या नैराशातून काँग्रेसचे नेते राहुल गांधी बेताल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. राहुल गांधी यांनी जगातील लोकप्रिय नेते देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या बद्दल अपशब्द वापरून अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने रेणापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रदेश सचिव ऋषिकेश रमेशआप्पा कराड यांच्या नेतृत्वात शुक्रवारी जाहीर निषेध करून राहुल गांधीच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन करण्यात आले.
देश का नेता कैसा हो नरेंद्र भाई जैसा हो, नरेंद्र मोदी जिंदाबाद, राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधीचा धिक्कार असो भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा अनेक गगनभेदी घोषणा देऊन रेणापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला, त्यानंतर राहुल गांधीच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन करण्यात आले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेध आंदोलन प्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अमर चव्हाण, विजय चव्हाण, गणेश तुरूप, चंद्रकांत आलापुरे, उज्वल कांबळे, दत्ता सरवदे, अच्युत कातळे, अविनाश रणदिवे, अजीम शेख, संतोष राठोड, शीला आचार्य, उत्तम चव्हाण, मारुती गायकवाड, दिलीप चव्हाण, प्रदीप चव्हाण, दत्ता आंबेकर, मारुफ आतार, धम्मानंद घोडके, किशोर श्रीगिरे, उत्तम घोडके, शेषेराव पवार, लखन आवळे, नरेश चपटे, दिगंबर येवले, पंकज काळे, मनोज चक्रे, रमेश चव्हाण, गणेश चव्हाण, संजय म्हेत्रे, बंडू चव्हाण, पप्पू कुडके, शेषराव पवार, राजू चव्हाण, गणेश आघाव, नर्सिंग जाभळे, प्रल्हाद आघाव, प्रशांत मिसाळ, संतोष घोडके, विष्णु आंबेकर, वैभव आघाव, शिदू कस्तूरे, कुमार माने, विठ्ठल गित्ते यांच्यासह रेणापूर शहरातील आणि तालुक्यातील भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते