Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

कार्यवाही करण्यात आलेला तहसीलदारांच्या ताब्यातील मुरमाचा हायवा लंपास

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!

व्वा तांदळे साहेब...चांगले काम चालू आहे लातूर मध्ये
कार्यवाही करण्यात आलेला तहसीलदारांच्या ताब्यातील मुरमाचा हायवा लंपास







व्वा तांदळे साहेब..अख्खा अधिकार्यांचा फौजफाटा एक हायवा संभाळू शकला नाही...तर जिल्ह्यातील अवैध वाळू,मुरूम उत्खनन करणारे वाहने कशी संभाळणार ..!हे देवच जानो.अवैध वाळू,मुरम वाहतूक करणर्यांना आता कसलीही भीती राहिली नाही,अधिकार्यांच्या भ्रष्टाचाराच्या गुणांनमुळे हे निर्ढावलेले असून शहरात लाखोंरुपयाचे मंथली घेणार्यांकडून आता काय अपेक्षा असणार.आता मा जिल्हाधिकारी मॅडम नी यावर गांभीर्यानी लक्ष घालून यावर कड़क पावले उचलने आपेक्षित आहे.

लातूर : मुरमाची अवैध वाहतूक करणाऱ्या हायवाला तहसीलदारांसह त्यांच्या पथकातील अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अडविले. गौनखनिज वाहतुकीची कोणतीही परवानगी नसल्याने हायवा चालक पळून गेला. सदर वाहन तहसीलच्या पथकाच्या ताब्यात होते. ते काही वेळातच अज्ञाताने लंपास केल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि.३) सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी (दि.३) सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे हे लातूर विमानतळावरून तहसील कार्यालयाकडे जात होते. त्यावेळी त्यांच्या वाहनाच्या ताफ्याला एक हायवा (एम एच २४ जे ९७४८) आडवा गेला. सदर वाहनाची चौकशी करण्याच्या सूचना तांदळे यांनी सोबतच्या अधिकाऱ्यांना दिल्या. त्यावेळीत्या हायवात अवैध प्रकारे भरलेला ५ ब्रास मुरूम होता. त्याची रॉयल्टीही भरलेली नव्हती. यामुळे सदर वाहन ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात आणण्याच्या सूचना तहसीलदार तांदळे यांनी चालकाला दिल्या. हे ऐकताच सदर हायवा चालकाने वाहन तेथेच सोडून धूम ठोकली. त्यानंतर हायवाला तहसीलच्या पथकाने सील केले. दरम्यान, शनिवारी दुपारच्या सुमारास तहसीलचे पथक हायवा ताब्यात घेऊन तहसील कार्यालय परिसरात लावण्यास गेले असता लावलेल्या ठिकाणी हायवा आढळून आला नाही. यामुळे मंडळ अधिकारी रामराव झाडे यांनी येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून अज्ञाताविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात हायवा चोरी गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.



Previous Post Next Post