स्वत:च्या खासदारकीचे स्वप्न भंग झाल्याने आता मुलाच्या खासदारकीची हाव!
लातूर -लातूर मध्ये आता लोकसभा निवडणूकीचे वारे गडद होताना दिसत आहे.नविन नविन चेहर्यांचे नावे आता या निवडणूकीच्या आखाड्यात समोर येत आहेत.प्रस्तापित खासदार सुधाकर श्रंगारे ते डाॅ अनिलकुमार गायकवाड़ अशी दिग्गज उमेदवारांची रस्सीखेच चालू होती.डाॅ अनिलकुमार गायकवाड़ यांचे असलेले भाजपा मधील संबंध याकारणाने खासदारकी फिक्स असल्याचे बोलले जात होते
त्यातचं डाॅ अनिलकुमार गायकवाड़ यांंना महाराष्ट्राच्या एम एस एम आर डी सी चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमणूक देण्यात आली आणि लातूरची खासदारकी ची चर्चा तिन नावावर येवून थांबली.त्यामुळे दिड वर्ष अज्ञात वासात असलेले प्रस्थापित खासदार सुधाकर श्रंगारे हे अचानक जागे होवून काम करण्यास सुरुवात केले.सकाळी लवकर उठून कार्यकर्त्यांना भेठी गाठी करत होते. भाजपा मधील एक तरुण तडफदार आणि सध्या नाव चरर्चीत असलेला चेहरा म्हणजे ॳॅड दिग्विजय काथवटे हे नाव लपून राहिलेले एकदम समोर आले.यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते दिल्ली पर्यंत आपले वर्चस्व निर्माण केले आहे.खरं तर भाजप तरुण आणि नविन चेहरा देणार असल्याने यांचे नाव एक नं.ला चालत आहे. डाॅ अनिलकुमार गायकवाड़ यांचे खासदारकीचे स्वप्न महाराष्ट्राच्या एम एस एम आर डी सी चे व्यवस्थापकीय संचालक पदामुळे भंग पावले होते परंतू त्यांची खासदारकीची हाव मात्र संपली नाही,ती आपल्या घरातच यावी असे वाटल्याने त्यांनी आपल्या मुलाला विश्वजीत गायकवाड़ यांना लातूरच्या जनतेसमोर ऐन केन मार्गा ने प्रस्थापित करत आहेत.आता "चला हवा येवू द्या" या कार्यक्रमाच्या इंजिनियर विश्वजीत अनिलकुमार गायकवाड़ मित्रमंडळ यांच्या माध्यमातून संपुर्ण लातूर शहरामध्ये त्यांचे फोटो असलेले बॅनर झळकत आहेत.अतिशय उच्च शिक्षित असलेले इंजिनियर विश्वजीत अनिलकुमार गायकवाड़ वेगवेगळया क्षेत्रा मध्ये त्यांनी आपले भाग्य आजमावले आता ते वडिलांच्या खासदारकीचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आपले भाग्य आजमावत आहेत.या खेळीने लातूर मधील खासदारकीचे राजकारण आणखीनचं तापत चालले आहे
.या तापलेल्या राजकारणात नेमका खासदारकीचा चेहरा ! कोणाचे?हे आता वेळचं ठरवेल !