आमदार खासदारांना गुंडाळणाऱ्या जिल्हाधिकारी....!!!
लातूर : लातूर येथे होत असलेल्या महसंस्कृती महोत्सव कार्यक्रमासोबत १०० वे नाट्य संमेलन जोडून लग्नात मुंज साजरी करून शासन स्तरावर खर्च मात्र लग्नाचा दाखविण्याचा प्रताप लातूरच्या जिल्हाधिकारी करीत असल्याच्या चर्चेला जिल्ह्यात उधान आले आहे.
खरे पाहिले असता महसंस्कृती महोत्सव हा संपूर्ण राज्यात शासनाच्या वतीने करोडो रुपयाचे स्वतंत्र बजेट देऊ प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्या तालुक्याला स्थानिक कलावंतासह चित्रकार आणि इतर लोकांना सहभागी करून शासनाच्या निर्देशा प्रमाने महसंस्कृती महोत्सव घेणे अपेक्षित आहे. परंतु लातूरच्या जिल्हा अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी कुठल्याही आमदार खासदार यांना या मोहोत्सवा विषयी विश्वासात घेतल्याचे चित्र दिसून येत नाही.केवळ उदगीरचे आमदार आणी कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी यबाबत हा
महसंस्कृती महोत्सव उदगीरला करण्याचे सांगितल्याचे त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या...मग निलंगा,औसा,रेणापूर्,अहमदपूर,चाकूर चे काय...तेथील नागरिकांना महसंस्कृती महोत्सव आपल्या गावी व्हावा असे वाटत नाही का?का त्यांनी हा मोहित्सव पहाण्यासाठी लातूरला यावे अशी अपेक्षा जिल्हाधिकारी यांची आहे का.?की या तालुक्याच्या आमदारांना आपल्या भागातील लोकांसाठी शासनाने ठरवून दिलेला कार्यक्रम न करण्याची नेमकी इच्छा का झाली हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
परंतु या महसंस्कृती महोत्सवाचे आयते बजेट १०० वे नाट्य संमेलन होत आहे यात दाखवून नेमके कोण कोणाचे उखळ पांढरे करून घेत आहे. आणि एवढे बजेट इकडे तिकडे फिरवले जात असताना जिल्ह्यात या कार्यक्रमासाठी निधीही गोळा केला जात आहे.शिवाय स्पॉन्सर शोधण्याचे कामही सुरु आहे. याबात विविध स्तरावर दबी चर्चा होत असून जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण जिल्ह्यासाठी असणारा महसंस्कृती महोत्सव केवळ लातूर आणी उदगीर पुरता मर्यादीत का केला यबाबत ही लोकात चर्चा सुरु आहे...दरम्यान यामुळे जिल्हातील आमदार खासदारापेक्षा जिल्हाधिकारी भारी अशी एक प्रतिक्रिया या कार्यक्रमामुळे सर्वत्र उमटली आहे...
![]() |
https://youtube.com/watch?v=au-UPoIV-AY&feature=shared |