Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

भव्य दिव्य श्री खाटूश्याम मुर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा महोत्सवास उपस्थित राहण्याचे अवाहन


भव्य दिव्य श्री खाटूश्याम मुर्ती स्थापना व प्राणप्रतिष्ठा महोत्सवास उपस्थित राहण्याचे अवाहन 



लातूर-प्रतिनिधि 
लातूर शहरापासून जवळच असलेल्या कोलू रोडवर नव्याने निर्माण होत असलेल्या भव्य दिव्य श्री खाटूश्याम मंदिराची उभारणी पूर्णत्वास आली आहे. या मंदिरात श्री खाटूश्यामजी, श्री गणेशजी, श्री सालासर बालाजी, श्री राणी सती दादीजी, श्री शंकर परिवार, श्री बाबा रामदेवजी, श्री विठ्ठल रुक्मिणीजी या सर्व सात देवतांच्या मूर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा महोत्सव १६ फेब्रुवारी २०२४ ते २२फेब्रुवारी २०२४ पर्यंत होणार आहे.याबाबत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक श्री खाटूश्याम मंदिर फाऊंडेशन चे संचालक आणि सदस्य श्री राजेश मित्तल , कमलकिशोर अग्रवाल,आनंद इलमचंद अग्रवाल यांनी मंदीरा संदर्भात संपुर्ण माहिती दिली.भव्य दिव्य श्री खाटूश्याम मंदिराची उभारणी हि १७००० स्वे फुट मध्ये करण्यात आली असून या मंदिराच्या उभारणीसाठी तब्बल तीन वर्ष लागले आहे. या मंदीरासाठी अतिशय धार्मिक आणि दानशुर सहा संचालकांनी मिळून भुमी दान केले .त्यानंतर सहा जनांचे संचालक मंडळ तयार करण्यात आले. या सर्व जनांनी अहोरात्र मेहनत करुन मंदीराची उभारणी केली आहे.
१६ फेब्रुवारी २०२४ ते २२फेब्रुवारी २०२४ पर्यंत चालणार्या सात दिवसीय महोत्सव कार्यक्रमा मध्ये प्रथम दिवशी दि.१६फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३० वाजता कलश यात्रा ,११ वाजता पंचांग पूजन, नादीमुख दुपारी २:३०ते ५:३० देवस्थापना पुजन व आरती त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता भजन संध्याचे आयोजन करण्यात आले आहे.द्वितीय दिवशी शनिवार दि. १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:३०ते१२ देवपुजन, आरणीमंथन,हवन,२:३०ते५:३०आरती त्यानंतर भजन. तृतिय दिवस दि१८ फेब्रुवारी सकाळी ८:३० ते १२ पुजन हवन, २:३० ते ५:३० आरती, जलाधिवास. चतुर्थ दिवस दि१९ फेब्रुवारी सकाळी ८:३० ते १२ देवस्थापन पुजन , हवन, २:३०ते५:३० हवन आरती. मुख्यत:
सात दिवस कार्यक्रम चालू राहणार आहेत.
बुधवार दि २१ फेब्रुवारी रोजी ध्वजारोहण आणि भव्यशोभा यात्रे चे आयोजन करण्यात आले आहे. हि शोभा यात्रा मुख्यत: महालक्ष्मी मंदिर गांधी चौक येथून हनुमान चौक - सुभाष चौक मार्गे गंजगोलाई - जगदंबा मंदिर येथे पोहचणार आहे. याच दिवशी संध्याकाळी ७:३०वाजता सुप्रसिध्द भजन गायीका अंजली द्विवेदी यांचे भजन संध्या होणार आहे. त्यानंतर शेवटच्या दिवशी दि २२ फेब्रुवारी रोजी दुपारी १२:४५ वाजता सर्व देवांची प्रथम आरती होणार आहे. त्यानंतर दुपारी १ते ४ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री राजेश अग्रवाल CA यांनी भगवान श्री खाटूश्याम यांची कथा सांगीतली -
 बर्बरिक हा जगातील सर्वोत्तम धनुर्धर होता. बर्बरिकाला तीन बाण पुरेसे होते, ज्याच्या जोरावर तो कौरव आणि पांडवांच्या संपूर्ण सैन्याचा नाश करू शकला असता. रणांगणावर भीमाचा नातू बर्बारिक याने दोन्ही छावणीच्या जवळ एका झाडाखाली उभे राहून प्रतिज्ञा केली की ज्या बाजूने पराभव होईल त्या बाजूने मी लढेन. बर्बरिकच्या या प्रतिज्ञेने श्रीकृष्णाला काळजी वाटली. 
अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण जेव्हा भीमाचा नातू बर्बारिक यांच्या शौर्याचा चमत्कार पाहण्यासाठी त्यांच्यासमोर प्रकट झाले, तेव्हा बर्बरिकाने त्यांच्या शौर्याचा एक छोटासा नमुना दाखवला. कृष्णाने सांगितले की जर तुम्ही या झाडाची सर्व पाने एकाच बाणाने टोचली तर मला ते मान्य होईल. बर्बरिकाने आज्ञा घेतली आणि झाडाच्या दिशेने बाण सोडला. 
बाण एकामागून एक सर्व पानांना छेदून जात होता, त्याच वेळी एक पान पडून खाली पडले. कृष्णाने पानाला पाय ठेवून लपवले तो टोचला जाऊ नये या विचाराने, पण सर्व पाने टोचणारा बाण शेवटी कृष्णाच्या पायाजवळ येऊन थांबला. तेव्हा बर्बरिक म्हणाले की, प्रभु, तुमच्या पायाखाली एक पान दडले आहे, कृपया तुमचे पाय बाजूला करा ,कारण मी बाणांना फक्त पाने टोचण्याचा आदेश दिला आहे, तुमचे पाय टोचण्याची नाही. 
त्यांचा हा चमत्कार पाहून कृष्ण आनंदित व चिंतातूर झाले. भगवान कृष्णाला माहित होते की बर्बरिका वचनानुसार हरलेल्याला साथ देईल. जर कौरव हरताना दिसले तर पांडवांना त्रास होईल आणि नंतर पांडव बर्बरीकसमोर हरताना दिसले तर तो पांडवांना साथ देईल. अशाप्रकारे तो एका बाणाने सर्वांचा शेवट करेल. बर्बरिक म्हणाला- तुम्हाला काय हवे आहे? ब्रह्मस्वरूप कृष्णाने सांगितले की तू देऊ शकणार नाहीस. पण बर्बरिक कृष्णाच्या जाळ्यात अडकला आणि कृष्णाने त्याचे शीश मागितले. बर्बरिकने स्वताच्या बाणाने शीश कृष्णाला दान दिले. बर्बरिकाचा बलिदान पाहून श्रीकृष्णाने कलियुगात बर्बरिकला स्वतःच्या नावाने पूजेचे वरदान दिले. 
९०० वर्षा पुर्वी भगवान खाटूश्याम चे शिश ज्या ठिकाणांवरुन जमिनी बाहेर आले त्याजागेचे नाव खाटू म्हणून संबोधले जाते.आज बर्बरिकाची खाटू श्याम म्हणून पूजा केली जाते. त्यामुळेच भगवान खाटूश्याम यांना "हारे का सहारा, खाटूश्याम हमारा"असे म्हटले जाते.

कार्यक्रमाच्या शेवटी श्री राजेश मित्तल यांनी सर्व पत्रकारांना भगवान श्री खाटूश्याम यांचा फोटो देवून सर्वांचे अभार मानून या अतिशय धार्मिक कार्यक्रमास लातूर मधील पत्रकारांनी व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे अवाहन केले. यावेळी संचालक विकास अग्रवाल, मुकेश मित्तल , राजेश अग्रवाल, कन्हैयालाल शाह, संतोष शर्मा व सहयोगी नंदकिशोर इंद्राज अग्रवाल, आनंद इलमचंद अग्रवाल, हनुमानजी रांदड, कमलकिशोर अग्रवाल, बंटी अग्रवाल आदी मान्यवरांची उपस्थिति होती.
Previous Post Next Post