छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भाजपा युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांच्याकडून विनम्र अभिवादन
लातूर दि.१९- श्रीमंतयोगी, नीतीवंत, बुद्धिवंत, गुणवंत, यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, पुण्यवंत, न्यायवंत, क्षत्रियकुलावतंस, जाणता राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस भाजपा युवा नेते ऋषिकेश रमेशआप्पा कराड यांनी पुष्पहार घालून पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.
भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांच्या लातूर येथील संवाद कार्यालयात झालेल्या शिवजयंती कार्यक्रमास भाजपाचे प्रदेश सदस्य अनिल भिसे, रेणापूर तालुकाध्यक्ष अॅड. दशरथ सरवदे, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष वसंत करमुडे, विजय काळे, चंद्रकांत कातळे, अशोक सावंत, गोपाळ शेंडगे, भागवत गिते, अमर चव्हाण, संतोष चव्हाण, दत्ता सरवदे, विपुल चेपट, माधव गुडे, सुकेश भंडारे, धनंजय बिक्कड, राज जाधव, अनिकेत बुड्डे, कार्तिक गंभीरे, लक्ष्मण खलंग्रे, ओम चप्पे, सुधाकर फुले यांच्यासह भाजपाचे लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.