गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
"बकरा"प्रकरण भोवले..पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथील एक अधिकारी निलंबित तर आठ पोलीस अमलदारांची पोलीस मुख्यालयात बदली.
![]() |
https://youtube.com/watch?v=au-UPoIV-AY&feature=shared |
याबाबत थोडक्यात माहिती अशी की, पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण समोर दिनांक 31/01/2024रोजी बकरा कापन्याचे घटनेची बातमी विविध माध्यमांतून प्रसिद्ध झाली होती.
त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी, उदगीर दिलीप भागवत यांना सदर घटनेच्या चौकशी चे आदेश दिले होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी,उदगीर दिलीप भागवत यांनी सदर घटनेची चौकशी केली असता प्राथमिक दृष्ट्या सदर घटनेस जबाबदार धरून पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे कार्यरत पोलीस उपनिरीक्षक यांना निलंबित करण्यात आले असून पोलीस ठाण्यातील पोलीस 08 पोलिस अमलदारांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आली आहे.
तसेच पोलीस निरीक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत आहे.
चौकशीत ठेवलेला ठपका
• पोलिस निरीक्षक अरविंद पवार : कार्यालयीन शिस्तभंग
• सहा. पोलिस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगले : बोकड ठाण्यात आणणे आणि त्याची मेजवानी देणे.
• बालाजी घारोळे, प्रताप माने, मुबारक मुल्ला, शिवप्रसाद रंगवाळ, माधव केंद्र, गणेश मिटकरी, बाळासाहेब गडदे, नजीर बागवान यांच्यावर बोकड कापणे व पुढील कार्यक्रमास मदत करण्याचा ठपका.