Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

उदगीर सह लातूर मध्ये स्वतः चे फायदे साठी देहविक्रय करून घेणाऱ्या सात जणांना अटक. नऊ पीडित महिलांची सुटका

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
उदगीर सह लातूर मध्ये स्वतः चे फायदे साठी देहविक्रय करून घेणाऱ्या सात जणांना अटक. नऊ पीडित महिलांची सुटका

पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनात लातूर पोलीसांची कारवाई,


"प्रभारी असलेले पो.नी. नरवाडे पोलीस स्टेशन एमआयडीसी लातूर  हे रात्रीतून लातूर मध्ये प्रसिद्धिच्या झोतात आले असून अचानक पडलेल्या धाडीने एम आय डी सी पोलीसांना अचंभित केले आहे.एवढा मोठा अड्डा शहरात चालू होता हे चकित होण्यासारखे असले तरी या कार्यवाहीमुळे सर्वसामान्य नागरिकांना या त्रासांपासून दिलासा भेटला आहे.अंतर्गत जे काही झाले आहे ते म्हत्वाचे नसून,त्यामुळे कार्यवाही झाली यातचं आनंद व्यक्त होत आहे."बदनाम हुआ ,तो क्या हुआ..नाम तो हो गया." आता 'बदनाम' कोण? आणि 'नाव' कोणाचे झाले ?  हे आता लपून राहिले नाही.
          या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की, लातूर शहरातील रामरहिम नगर भागात व उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील देगलूर रोड भागात काही महिला व पुरुष स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरून स्त्रियांना बोलावून घेऊन त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत आहे.
                 सदर माहितीची खातरजमा केल्यानंतर सदरची बाब खरी असल्याचे निदर्शनास येताच दिनांक 15/02/2024 रोजी पोलीस अधीक्षक श्री.सोमय मुंडे ,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अजय देवरे, यांचे मार्गदर्शनात व नेतृत्वात एएचटीयु पथक, पोलीस अधीक्षक कार्यालय, लातूर व उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे यांचे पोलीस अधिकारी व महिला अमलदार यांचे पथकाने बनावट ग्राहक पाठवून मिळालेल्या माहितीची सत्यता पडताळून ती खरी असल्याचे निदर्शनास येताच लातूर व उदगीर मध्ये एकाच वेळी छापा मारण्यात आला.
          दोन्ही ठिकाणी देहविक्री करीत असताना एकूण 9 पिडीत महिला व वेश्या व्यवसाय करून घेणारे 7 महिला व एक पुरुष आढळून आले.
             तसेच पिडीत महिलांकडून देहविक्रय व्यवसाय करून घेणारे, स्वतःच्या फायद्यासाठी बाहेर गावाच्या महिलांना स्वतःचे घरात ठेवून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतात व आम्हाला काही रक्कम देऊन आमची राहण्याची खाण्यापिण्याची व्यवस्था करतात असे पीडित महिलांनी सांगितले. 
               सदर प्रकारा बाबत पोलीस पोलीस ठाणे एमआयडीसी येथे गुन्हा रजिस्टर नंबर 125/2024 कलम 3, 4, 5, 7 अनैतिक व्यवसाय प्रतिबंध अधिनियम 1956 व सहकलम 370 , 34 भा.द.वि. तसेच पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण येथे गुन्हा रजिस्टर नंबर 93/2024 कलम 3, 4, 5, 7अनैतिक व्यवसाय प्रतिबंध अधिनियम 1956 व सहकलम 370 , 34 भा.द.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून कुंटणखाना चालणाऱ्या महिला व पुरुषांना अटक करण्यात आली आहे.लातूर येथे झालेल्या कार्यवाहीतील आरोपी -1 पूजा पंढरी वल्लुरे, 2-ज्ञानेश्वर पंढरी वल्लुरे, 3*सचिन अशोक उबाळे सर्व राहणार गायनदेव मंगल कार्यालयाच्या मागे राम रहीम नगर आडगाव रोड लातूर
            गुन्ह्याचा पुढील तपास पो.नी. नरवाडे पोलीस स्टेशन एमआयडीसी लातूर  व उदगीर ग्रामीण चे पोलिस अधिकारी व अंमलदार करीत आहेत.
Previous Post Next Post