Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

व्हाईस ॴॅफ मिडिया च्या आंदोलनास यश;पोलीस निरीक्षकांच्या लेखी आश्‍वासनानंतर रेणापूरातील आमरण उपोषण मागेे

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
व्हाईस ॴॅफ मिडिया च्या आंदोलनास यश;पोलीस निरीक्षकांच्या लेखी आश्‍वासनानंतर रेणापूरातील आमरण उपोषण मागेे
खोटा गुन्हा दाखल ः योग्य ती चौकशी करून दोषीवर कार्यवाही करण्याचे दिले लेखी आश्‍वासन



लातूर दि.22/02/2024
रेणापूर येथील पत्रकार ईश्वर बद्दर यांच्यावर दाखल करण्यात आलेला खोटा गुन्हा तात्काळ मागे घेण्यात यावा,पत्रकारावर खोटा गुन्हा दाखल करणार्‍यावर कार्यवाही करून सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करावी. या मागण्यांसाठी रेणापूर तालुका व्हाईस ऑफ मिडीयाच्यावतीने गुरुवारी (दि. 22 ) तालुक्यातील पत्रकारांनी रेणापूर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण केले आणि पोलीस निरिक्षांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव येथील एका प्रकरणात पत्रकार ईश्वर बद्दर यांच्यावर कसलीही चौकशी न करता 306 सारख्या गंभीर कलमाखाली खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तालुक्यातील सर्व पत्रकारांनी पोलीस अधिक्षक,तहसीलदार,पोलीस निरीक्षक यांची भेट घेवुन निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करावी. अशी मागणी करण्यात आली होती. परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी न करताच गुन्हा दाखल केल्याने रेणापुर तालुका व्हाईस ऑफ मिडीयाच्यावतीने तालुक्यातील विठ्ठल कटके, रफीक शिकलकर,सिद्धार्थ चव्हाण, बालाजी कटके,कोंडीराम काळे,नामदेव शिंदे,विष्णु आचार्य, सुधाकर दहिफळे, सुधाकर फुले,आर.डी. अपसिंगेकर, यशवंत पवार,अनिल फुलारी, शिवाजी येमते,सतिष जाधव,मधुकर गालफाडे, शरद राठोड,संतोष तुरूप,गोपाळ चिताडे, बाळय्या स्वामी,वाल्मीक केंद्रे,चंद्रकांत कातळे, वसंतराव सूर्यवंशी आदि पत्रकारांनी गुरुवारी ( दि.22 ) सकाळी 11 वाजल्यापासून रेणापूर तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले होते. दरम्यान पोलीस निरीक्षक अशोक अनंञे यांनी सायंकाळी उपोषण स्थळी भेट देऊन सदरील प्रकरणाची सखोल चौकशी व योग्य तपास करुन योग्य कारवाई करण्यात येईल असे लेखी अश्वासन दिल्याने सुरु आसलेले उपोषण मागे घेण्यात आले.
Previous Post Next Post