Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

शिवसेनेच्या माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांची फेसबुक लाइव्हवेळी गोळ्या झाडून हत्या

गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
शिवसेनेच्या माजी नगरसेव अभिषेक घोसाळकरांची फेसबुक लाइव्हवेळी गोळ्या झाडून हत्या




अभिषेक घोसाळकरांवर सोबत बसलेल्यानेच चालवल्या पाच गोळ्या

दहिसरमध्ये थरार; आठवडाभरात दुसऱ्यांदा राजकीय नेत्यावर हल्ला

मारेकरी मॉरिस नोरोन्हानेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय

हत्येपूर्वी घोसाळकर (उजवीकडे) व मॉरिस यांचे फेसबुक लाइव्ह सुरू होते. 

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांवर मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाई याने स्वतःच्या कार्यालयात फेसबुक लाइव्हवेळी पाच गोळ्या झाडून त्यांची हत्या केली, घोसाळकरांच्या हत्येपाठोपाठ मॉरिसनेही स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी पोलिसांसह गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.

अभिषेक शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा आहे. मॉरिस आणि अभिषेक यांच्यात अनेक वर्षांपासून मतभेद होते, ते नुकतेच मिटल्याचा दावा केला जात होता. मॉरिस याने गुरुवारी कार्यालयाबाहेर साडी वितरणाचा कार्यक्रम ठेवला. त्याला घोसाळकर यांना बोलावण्यात आले होते. ते पोहोचताच त्यांनी गळाभेट घेतली. दोघेही एकत्र आल्याने कार्यकर्त्यांमध्येही जल्लोष होता. त्यानंतर, साडेसातच्या सुमारास आपण एकत्र आल्याचे नागरिकांना समजावे म्हणून मॉरिसने फेसबुक लाइव्हसाठी अभिषेक यांना ('संमिश्र'वर)

लाइव्ह सुरू असताना मॉरिस पुढे उतून जात घोसाळकर यांना बोलायला सांगत होता.हे सुरू असतानाच मॉरिसने समोरून घोसाळकरांवर पाच गोळ्या झाडल्या.

मॉरिसच्या फेसबुक लाइव्हदरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला. या चार मिनिटांच्या फेसबुक लाइव्हमध्ये मॉरिस सुरुवातीला गाँड ब्लेस यू म्हणत घोसाळकरांना बोलण्यास सांगतो. घोसाळकर यांनी बोलताना, आज मॉरिस भाईसोबत लाइव्ह येण्याची संधी मिळाली.

■ अनेकजण सरप्राइज होतील. यावर मॉरिस मध्येच येत, आज बहोत सारे लोग सरप्राइज होगे असे म्हणतो, तसेच काही गोष्ठी एकतेसाठी, चांगले काम करण्यासाठी होतात, असेही बोलून पुन्हा घोसाळकरांना दोन शब्द बोलण्याचा आग्रह करतो. घोसाळकर यांनी बोलताना, एक चांगली दिशा घेऊन आम्ही पुढे जात आहोत.

■ साडी, रेशन वाटण्याच्या कार्यक्रमाबरोबरच मुंबई ते नाशिक बस प्रवास सुरु करणार आहोत. नवीन वर्षाचा नवीन संकल्प घेत एकत्र काम करणार आहोत. आमच्यात तसेच कार्यकत्र्यामध्ये काही गैरसमज होते. मात्र आता तसे नाही. एकत्र येत काम करणार असे ते बोलताना दिसत आहे. बोलणे झाल्यानंतर उठून जात असतानाच त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्याचे दिसून आले.
Previous Post Next Post