गुन्हेगारीचा पर्दाफाश….!
भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार
कल्याण : कल्याण जवळील द्वारली गाव हद्दीतील जमिनीचा वाद सामोपचाराने मिटविण्यासाठी हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड आणि प्रतिस्पर्धी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह त्यांचे समर्थक बसले होते. त्याचवेळी अचानकपणे गणपत गायकवाड यांनी जवळील रिव्हाॅल्व्हरमधून महेश यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गोळीबार केला. या घटनेचा संपुर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचे चित्रीकरण समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने खळबळ उडाली आहे.
आमदार गायकवाड यांनी निशाणा साधून गोळीबार केल्याची पोलिसांनी दिली असून या माहितीला सीसीटीव्ही चित्रणामुळे दुजोरा मिळाला आहे. हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या दालनात शिवसेनेचे महेश पाटील, राहुल पाटील बसले होते. त्यांच्या समोरील बाजूस पोलीस अधिकाऱ्याच्या बाजुला आमदार गायकवाड हे बसले होते. त्याचवेळी दालनाच्या नागरिकांचा बाहेर ओरडा सुरू होता. तो शांत करण्याचे आवाहन पोलीस अधिकारी करत होते