ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यासाठी आंदोलन करणारे ब्राह्मण सामाजाचे नेते दीपक रणनवरे सुखरुप परतले
जालना- ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे या मागणीसाठी 28 नोव्हेंबर पासून आठ दिवस आमरण उपोषण करणारे ब्राह्मण समाजाचे नेते दीपक गोपाराव रणनवरे, वय 51 हे बुधवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून बेपत्ता झाले होते त्यानंतर दिपक रणनवरे यांची पत्नी भारती दीपक रणनवरे, वय 48 यांनी जालना पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी दीपक रणनवरे हरवल्याची नोंद केली केली.परंतू ते सुखरुप घरी परतले आसल्याची माहिती आता समोर आली आहे.ते त्यांच्या वयक्त्तिक टेंशन मुळे बाहेर गेले होते आता ते परत आल्याने त्यांच्या निकटवर्तीयांनी आणि समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ब्राह्मण समाजासाठी नेहमीच झटत राहणारे दीपक रणवरे समाजाच्या विविध मागण्यांसाठी नेहमीच काही ना काहीतरी आंदोलने ,निदर्शने ते करत आहेत. परंतु सर्वात मोठे आंदोलन हे दिनांक 28 नोव्हेंबर पासून जालना येथील गांधी चमन परिसरात आमरण उपोषण करून त्यांनी केले. ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे ही यावेळची प्रमुख मागणी होती आणि या मागणीला यशही आले आहे. आठ दिवसांच्या उपोषणानंतर मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चेसाठी आमंत्रण आल्यावर त्यांनी उपोषण मागे घेतले आणि नुकतेच हे महामंडळ स्थापन करण्यासाठी शासनाने ठरावही घेतला.