Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आम्ही सगळे आयोजक ; आमच्यावर गुन्हे दाखल करावेत - सकल ब्राह्मण समाजाचे पोलिसांना निवेदन

ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आम्ही सगळे आयोजक ; आमच्यावर गुन्हे दाखल करावेत - सकल ब्राह्मण समाजाचे पोलिसांना निवेदन



परळी वैजनाथ, वैजनाथ.......
         परळी वैजनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या ब्राह्मण ऐक्य परिषदेचे आयोजक सकल ब्राह्मण समाज परळी वैजनाथ हे असुन या परिषदेचे स्वागताध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावर आयोजक म्हणून दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा अन्यथा आम्ही सगळे आयोजक आहोत आमच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी निवेदनाद्वारे परळीतील सकल ब्राह्मण समाजाकडून करण्यात आली आहे.
       सकल ब्राह्मण समाजाकडून पोलीसांना आज निवेदन दिले असुन बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावरील गुन्हा मागे घेण्याची मागणी केली.ब्राह्मण ऐक्य परिषदेचे मुख्य आयोजक आम्ही सर्व ब्राह्मण समाज आहोत. कार्यक्रमाचे नियोजन व जबाबदाऱ्या याचा एक भाग म्हणून परळीतील सर्व ब्राह्मण समाजाने या परिषदेची केवळ स्वागताध्यक्ष पदाची जबाबदारी ही आमच्या समाजाचे नेते बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावर दिली होती.त्यामुळे या परिषदेचे आयोजक म्हणून गुन्हा नोंदवून घेत असताना केवळ बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावर आपण गुन्हा दाखल केला आहे हे योग्य नाही.या परिषदेचे मुख्य आयोजक आम्ही सर्व ब्राह्मण समाज परळी वैजनाथ आहोत.संपूर्ण आयोजन,नियोजन, संयोजन ब्राह्मण समाज परळी वैजनाथ यांनी केलेले आहे. 
          आयोजक म्हणून बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांच्यावरील नाहक दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा अशी सकल ब्राह्मण समाजाकडून मागणी करण्यात आली.यावेळी समाजातील अबाल, वृद्ध,महिलाभगिनी,समाजबांधव मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात उपस्थित होते.
Previous Post Next Post