Breaking News
अबब....२२ कोटींचा अपहार करणारा लेखा विभागातील कारकुन..!लातूर जिल्हाधिकारी कार्यालयातील धक्कादायक प्रकार

पत्रकारांनी समाजाच्या प्रश्नांची काळजी घ्यावी;आरोग्याची काळजी मी घेतो - आ. रमेशअप्‍पा कराड

पत्रकारांनी समाजाच्या प्रश्नांची काळजी घ्यावी;आरोग्याची काळजी मी घेतो - आ. रमेशअप्‍पा कराड

जिल्ह्यातील पत्रकारांना एमआयटीचे आरोग्य सुरक्षा कवच
व्हॉईस ऑफ मीडियाच्या महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद


















        लातूर दि.०२- लोकशाहीत समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात पत्रकारांचे मोठे योगदान आहे. पत्रकारांनी समाजाच्या सर्वांगीण प्रश्नांची काळजी घ्यावी. जिल्ह्यातील पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्य सुरक्षा कवच देऊन मी घेतो असे प्रतिपादन भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी केले.

         व्हॉइस ऑफ मीडिया आणि यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील पत्रकारांच्या आरोग्य शिबिराचा शुभारंभ आणि आयुष्यमान भारत आरोग्य कार्डचे वितरण आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, एमआयटी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. एन. पी. जमादार, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया, मराठवाडा संघटक बालाजी फड, लातूर जिल्हाध्यक्ष संगम कोटलवार, इलेक्ट्रॉनिक्स विभाग अध्यक्ष निशांत भद्रेश्वर, साप्ताहिक विभाग अध्यक्ष विष्णू अष्टेकर, शैक्षणिक विभाग अध्यक्ष चेतन कात्रे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

        यावेळी बोलताना आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, पत्रकारांनी जे चांगले आहे ते चांगले म्हणून आणि वाईट आहे ते वाईट म्हणून समाजास सांगितले पाहिजे. मात्र चांगल्याचे वाईट आणि वाईटाचे चांगले अशी विसंगती पत्रकारांच्या हातून होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करून व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारांच्या हिताचे काम व त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक केली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

         पत्रकारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन पातळीवर जिथे जिथे मदत लागेल तिथे तिथे मी स्वतः पुढाकार घेऊन मदत करेल अशी ग्वाही देऊन आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील ७० हजार कुटुंबांना एमआयटीच्या यशवंतराव चव्हाण ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून त्यागमूर्ती प्रयागअक्का कराड आरोग्य सुरक्षा योजनेअंतर्गत दत्तक घेऊन त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. त्याच धर्तीवर जिल्ह्यातील पत्रकारांना आरोग्य सुरक्षा कवच दिले जाईल असे बोलून दाखविले. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी गेल्या दहा वर्षात गरजू लाभार्थ्यांना विविध योजनेच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले असल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली.

          पंचसूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील पत्रकारांना न्याय देण्याचे काम होत आहे. पत्रकाराचे हे संघटन आता ४० देशात पोहोचले आहे येत्या दोन वर्षात १९५ देशात पोहोचेल असे सांगून वाईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यावेळी बोलताना म्हणाले की, लढा आणि चळवळ याला कृतिशीलतेची जोड दिल्यामुळे हा प्रवास विस्तारत असल्याचे सांगून पत्रकारांच्या घर बांधणीचा प्रकल्प लातूर शाखेने हाती घ्यावा अशी सूचना केली.

          याप्रसंगी एमआयटीचे डॉ. एन. पी. जमादार, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी आ. रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त पत्रकार प्रशांत शेटे, संग्राम वाघमारे, विनोद नीला, विकास स्वामी यांचा यथोचित सत्कार केला. आरोग्य शिबिरात उपस्थित दोनशेहून अधिक पत्रकारांची तज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सितम सोनवणे यांनी केले तर शेवटी जिल्हा कार्याध्यक्ष शहाजी पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेचे जिल्हा, तालुका पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Previous Post Next Post